जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर (घुगे) यांचे आदेशाने तंबाखू मुक्त लातूर साठी तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई
जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर (घुगे) यांचे आदेशाने तंबाखू मुक्त लातूर साठी तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई
लातूर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, लातूर मा. श्रीमती वर्षा ठाकूर (घुगे) यांनी लातूर जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुख यांना आदेश काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणीं तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ सेवन करणे ,बाळगणे, विक्री करणे व थुंकणे तंबाखू प्रतिबंध COTPA 2003 कायद्यानुसार गुन्हा आहे.तसेच 18 वर्षा खालील मुलांच्या हस्ते विक्री करणे व मुलांना विक्री करणे दंडनीय गुन्हा आहे. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय, आस्थापना, खाजगी तथा सरकारी संस्था यांच्या प्रमुखांनी त्यांचे कार्यालय तंबाखू मुक्त ठेवले पाहिजे. कोटपा कायद्यानुसार कोणत्याही संस्थेच्या किंवा आस्थापनाच्या 100 यार्ड परिसर या परिघात तंबाखू विक्री करणे गुन्हा आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस विभागातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री दिलीप सागर ,गांधी चौक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर देडे, श्री. शाहू बनसोडे, श्री.कोतवाड, श्री. डी एस.गिर, श्री. महेश गिरी , श्री. महादेव मांजरे, श्री. जी. जी.साबळे व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा सल्लागार डॉ उटिकर, श्री बेम्बरे , सौ शेडोळे, श्री. पवार, श्री. स्वामी, श्री. कांबळे यांनी ट्युशन एरिया, सूतमील रोड, गांधी मार्केट, हनुमान चौक, बस स्थानक व शाहू महाविद्यालय परिसर येथे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी अवैध रित्या विक्री करणारे पान शॉप वर अचानक भेट देऊन तेथील तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली. यात 24 गुन्ह्यामध्ये 10,100/- रुपये दंड आकारण्यात आला.