जखमी १९ वर्षीय गोविंदाचा उपचारा दरम्यान मृत्यू…अहमदपूर शहरावर शोककळा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात योध्दा प्रतिष्ठानने आयोजीत केलेल्या दहिहंडी स्पर्धेत दही हंडी फोडण्यासाठी रचलेल्या चौथ्या थरावरून कोसळून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या १९ वर्षीय गोविंदाचा दि २८ ऑगष्ठ रोजी रात्री अंदाजे १० : ३० वाजता मृत्यू झाला
अहमदपूर शहरातील मेन रोड वरील डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकात योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दही हंडी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत दहीहंडी फोडणाऱ्या ग्रुपला भव्य बक्षीस ही देण्यात येते तालुक्यातील अनेक संघ यात सहभाग घेत असतात.
दि २८ ऑगष्ठ रोजी झालेल्या स्पर्धेत अहमदपूर येथील साठे नगर भागातील एका गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता.यात उदय महेश कसबे हा १९ वर्षीय नव तरुण मुलगाही सहभागी झाला होता. तो दही हंडी फोडण्यासाठी चौथ्या थरावर गेला आणि तोल ढासळून खाली पडला होता..यात तो जबर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर अहमदपूर येथे प्रथमोउपचार करून लातुर येथील शासकिय रूग्णालयात पाठवण्यात आले होते परंतु रूग्णालयात पोहचताच रात्री अंदाजे १० : ३० वाजता डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.
या घटनेची माहिती मिळतच उदय याचा मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी दि २९ ऑगष्ठ रोजी सकाळी अहमदपूर पोलीस ठाण्यात ठिय्या येऊन गर्दी केली होती व आयोजकांवर गुन्हा दाखल करा अन्यथा अत्यंसंस्कार करणार नाही अशी भुमिका घेतल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता शेवटी मयतांच्या पालकांनी आयोजका विरुद्ध दिलेली फिर्याद मागे घेतली असल्यामुळे सायंकाळी अंदाजे ५ : ०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचा पश्चात आई वडिल बहीण भाऊ असा परिवार आहे या घटनेची माहीती कळताच अहमदपूर शहरावर शोककळा पसरली.