७० वर्षांच्या वृद्ध महिलेवरील अत्याचाराचा निषेध
अहमदपूर (गोविंद काळे) : औसा तालुक्यातील भेटा येथे एका ७० वर्ष वृद्ध महिलेवर बलात्कार करून, खून केल्याची घटना नुकतीच घडली. असे क्रूर कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल व हिंदू संघटनेच्या वतीने २७ ऑगस्ट रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली. तसेच घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
औसा तालुक्यातील भेटा गावात ७० वर्षांच्या वृद्ध महिलेवर आरोपीने दुष्कृत्य करून तिचा खून केला. अशा राक्षसाला समाजात राहण्याचा कसलाच अधिकार नाही. त्या राक्षसावर कठोर कारवाई करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी व पीडित महिलेच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी पांडुरंग लोकरे, ज्ञानोबा बडगीरे, संभाजी केंद्रे, संजय मुसळे, अॅड. सोपान फुले, सुभाष गुंडीले, मनोज उकिरडे, बालाजी पारेकर, ज्ञानेश्वर बनसोडे, बालाजी करले, महेंद्र देवकते, गणेश तपघाले, गणेश तुरेवाले, बालाजी मसुरे, राजेंद्र सावंत, नागेश गुट्टे, नागनाथ कांबळे, राहुल तलवारे, मारुती कांबळे, पंढरी परतवाघ, राजकुमार बाजगीर, अंबादास बाजगीर, गणेश लोकरे, नितीन काळे, शिवा कोमलवार, आनंद वतणे उपस्थित होते.