यशवंत विद्यालयात ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयामध्ये क्रीडा महर्षी मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी गजानन शिंदे म्हणाले की, जीवनामध्ये अभ्यासासोबत खेळाला सुद्धा अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे महत्त्व असल्याचे सांगून मुलामुलींनी अभ्यासासोबत खेळामध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन केले.
सूत्रसंचालन संतोष कदम यांनी आभार दीपक हिंगणे यांनी मांनले.
या कार्यक्रमाला प्रतिभा मिरजकर, विजय चव्हाण, सुनील धनुरे, राजू पाटील, गहिनीनाथ क्षिरसागर, क्रीडापटू यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि खेळाडू विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.