यशवंत विद्यालयात संस्काराची दहीहंडी उत्साहात साजरी दहीहंडी निमित्त विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत विद्यालयात गोपाळकाला निमित्त संस्काराची दहीहंडी कार्यक्रम विविध पारंपारिक वेशभूषेत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून एम बी वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.
दहीहंडी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आली. या समयी उपमुख्याध्यापक माधव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली तर पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी स्वच्छता मॉनिटर अभियानाबाबत कार्य व जबाबदाऱ्या यांचे विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, बलराम आणि विद्यार्थिनींनी राधा व विविध पारंपारिक पोशाख परिधान करून दहीहंडी निमित्त टिपरी नृत्य व विविध सांस्कृतिक कलेचे प्रदर्शन केले .
कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख के डी बिरादार यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी शाळेतील महिला शिक्षिका विजया स्वामी, सविता झोळगीकर, पुष्पा साकोळे, वर्षा लगडे, वर्षाराणी कांबळे, सोनल नानापूरे सह सुनील स्वामी, राजेश कजेवाड, सतीश बैकरे, विजय वाडकर,सचिन लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.