संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाचे यश जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धेसाठी चार विद्यार्थ्यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : पावसाळी क्रीडा स्पर्धेत तालुका स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या योगासनाच्या स्पर्धा नुकत्याच अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अहमदपूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाचा प्रणव काशिनाथ पुणे, वेदांत पुरुषोत्तम पंचारे, मुलींमधून सोनाक्षी संतोष दराडे, श्रेया प्रल्हाद करंडे या चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावरील योगा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सदरील स्पर्धा 28 व 29 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मीर सय्यद यांनी मार्गदर्शन केले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील ,संस्थेच्या सचिव तथा भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस प्राचार्या रेखाताई तरडे उपाध्यक्षा अँड. मानसी हाके गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, केंद्रप्रमुख मठपती, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापिका मीना तोवर,बब्रुवान कलाले सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.