शिवाजी विद्यालयाचा एकलिंगे आदित्य सिद्धेश्वर हा कुस्ती स्पर्धेत तालुक्यातून सर्वप्रथम
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेद्वारे संचलित शिवाजी माध्यमिक विद्यालय रोहिना येथील खेळाडूला तालुकास्तरावर सर्वप्रथम पारितोषक मिळाले आहे.भगतसिंग विद्यालय,आष्टा तालुका चाकूर येथे तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत आदित्य सिद्धेश्वर एकलिंगे हा कुस्तीपटू खेळाडू सर्वप्रथम आला असून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुपोषपाणि आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर,सचिव विक्रम संकाये,सहसचिव सौ.अंजुमनी ताई आर्य संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.तसेच शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे,संजय देबडवार,क्रीडा शिक्षक विकास जमादार व शिक्षक वृंद व सर्वच ग्रामस्थांनी या घवघवीत यशाबद्दल आदित्य एकलिंगे यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.