डोंगरशेळकी ग्रामस्थांनी केला पोलीस पाटील यांचा गौरव!
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे डोंगर शेळकी येथील आदर्श पोलीस पाटील तथा उदगीर तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील यांना महसूल दिनानिमित्य लातूर येथे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला, पोलीस पाटील हे सतत गावात नवतरुणांना मार्गदर्शन करून व्यसनाधीन होण्यापासून परवृत्त करत आहेत. समाजविघातक कोणते कृत्य करू नका असे सांगून तशा कृत्या पासून दूर रहा व शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी सतत मार्गदर्शन करतात. तसेच ते गावातील गोरगरीबाच्या सुखदुखत सामील रहातात, व गावात कोणावरही अन्याय होणार नाही, गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या साठी सतत प्रयत्नशील रहातात. सर्वासोबत मिळून मिसळून प्रशासन व जनता याच्या मधील दुवा म्हणून उत्कृष्ट असे कार्य करतात. त्या बद्दल समस्त डोंगरशेळकी ग्रामस्थांनी आदर्श पोलीस पाटील भालचंद्र शेळके पाटील यांचा गावचे उपसरपंच गणपत पवार यांच्या हस्ते श्री समर्थाचा फोटो व शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.या वेळी पंचायत समिती चे माजी उप सभापती बाळासाहेब मरलापल्ले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.