प्रा. सुनिल गरड यांना पी.एच. डी. मिळाल्याबद्दल नगरसेवक सुधीर लखनगावे यांनी केला सत्कार
निलंगा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र काँंलेज आँंफ फार्मसी, निलंगा येथील फार्माकाँंगनोसी विषयाचे प्रा. सुनिल व्यंकटराव गरड यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने फँंकल्टी आँंफ साँंयन्स अँंन्ड फार्मसी टेकन्नालाँंजी शाखेतील नुकतीच विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) पदवी पदवीदान समारंभा मध्ये प्रदान करण्यात आली.
याबद्दल त्यांचा महाराष्ट्र काँंलेज आँंफ फार्मसी, निलंगा येथील पदवीचे माजी विद्यार्थी तथा शिरुर अनंतपाळ जि. लातुर येथील नगरसेवक. सुधीर लखनगावे यांनी यथोचीत सत्कार करुन गुरुप्रती आदर केला.
प्रा. डाँं. सुनिल गरड यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील फार्मसी अभ्यास मंडळाचे चेअरमन तथा प्राचार्य. डाँं. सिध्देश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ” आयसोलेशन डाँंकींग अँंन्ड स्क्रीनींग आँंफ फायटोकाँंस्टीटीयुंट फ्राँंम सम अँंन्टीडायबेटीक पँल्नाटस विथ बोविन सिरम अँंल्बुमिन ” या विषयात संशोधन शोधप्रबंध नांदेड विद्यापिठाकडे सादर केला होता या शोधप्रबंधाला विद्यापिठाने नुकतीच मान्यता दिली.
यावेळी माजी विद्यार्थी तथा नगरसेवक. सुधीर लखनगावे, प्राचार्य. डाँं. एस.एस. पाटील, प्रा.डाँं. शरद उसनाळे, प्रा. रविराज मोरे, प्रा.डाँं. सुरज वाकोडे, ग्रंथपाल.निवृत्ती गारडी, निलंगा विधानसभा युवक काँंग्रेस सरचिटणीस. प्रसाद झरकर,शिरीष वलांडे, आतीष वलांडे यांच्यासह काँंलेजमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
प्रा.डाँं. सुनिल व्यंकटराव गरड यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटीचे सरचिटणीस. अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर, डाँं. शरद शिवाजीराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थाअध्यक्ष. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्राचार्य. डाँं. भागवतराव पौळ, प्राचार्य. डाँं. एस.एस. पाटील यांनी अभिनंदन केले.
तसेच या यशाबद्दल प्रा.डाँं. सुनिल गरड यांचे मित्रपरिवार, विद्यार्थी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह प्रा. डाँं. सुनिल गरड यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.