विश्वजित गायकवाड बनलेत बालगोपालांचे विश्वजीत दादा!

0
विश्वजित गायकवाड बनलेत बालगोपालांचे विश्वजीत दादा!

विश्वजित गायकवाड बनलेत बालगोपालांचे विश्वजीत दादा!

उदगीर (प्रतिनिधी) : खरे तर मी मी म्हणणाऱ्याना बालकांचा हट्ट पुरवता येत नाही किंवा बालकांमध्ये मिसळता येत नाही, मात्र स्वतः उच्चभूषित असलेला युवा नेता इंजि. विश्वजीत अनिल कुमार गायकवाड हे ज्येष्ठांसोबत ज्येष्ठ, तरुणांसोबत तरुण आणि मुलांसोबत लहान बालक होऊन सर्वांची हित पाहतो आहे. ही गोष्ट उदगीर पंचक्रोशी मध्ये आता सर्वसामान्य माणूस बोलू लागला आहे.
त्याला कारण ही तसेच आहे, इंजि. अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे , नौकरी ,व्यवसाय करून स्थिर व्हावे. यासाठी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असे शालेय साहित्य , शिलाई मशीन , रोजगार मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांच्या कायम पाठीशी राहण्याचा जणू संकल्पच इंजि. विश्वजित गायकवाड यांनी केला आहे की काय कारण त्यांच्या कृतीतून हे सर्व आता जनतेला दिसू लागले आहे.
केवळ उदगीर तालुक्यातच नव्हे तर देवणी , शिरूर अनंतपाळ , लातूर , ठाणे , मुंबई आदी ठिकाणी ३०हजार पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग , टी शर्ट , वही , पेन्सिल , गरीब विद्यार्थिनी तथा महिलांना शिलाई मशीन , सुशिक्षित तरुणांना रोजगार मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून व्यवसाय साठी कर्ज , तसेच पुणे, मुंबई येथे कंपनी मध्ये नौकरी मिळवून दिल्याने गाव खेड्यात उत्साहात स्वागत होत आहे . बालका पासून ज्येष्ठ नागरिक यांचा त्यांच्या भोवती गराडा पडलेला असतो. आधी केले मग सांगितले या वचनाप्रमाणे कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ समाजसेवेने झपाटलेल्या या युवा नेत्याने लातूर जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात जवळपास 300 महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण आणि शिलाई मशीनचे वाटप करून रोजगार तर दिलाच दिला त्यांनी शिलाई केलेल्या कापडी पिशव्या स्वतः खरेदी करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचे धडे दिले आहेत देत राहतील अशी त्यांच्या फाउंडेशन ची संकल्पना आहे प्रत्यक्ष ते सेवा बजावत आहेत.
कसलेही खोटी आश्वासन , प्रलोभन न देता आवश्यक अशी मदत केली जात असल्याने विद्यार्थी त्यांना पाहताच विश्वजीतदादा म्हणून जोर जोऱ्यात ओरडुन आपल्याकडे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत .
निष्पाप, निरागस अशा या लहान मुलांचे प्रेम पाहून विश्वजीत गायकवाड भारावून जातात. लहान मुलांत रमणारा तरुण नेता म्हणून विश्वजीत गायकवाड यांच्याकडे पाहिले जात आहे.

चौकट
अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुले जी मोठ्या आणि खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या चिमुकल्यांनी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलाच्या पाठीवर इंजिनीयर विश्वजीत गायकवाड यांच्या फाउंडेशन ची स्कूल बॅग पाहिली तेव्हा त्यांनी आपल्या आई-वडिलाकडे आम्हालाही तसलीच बॅग पाहिजे असा हट्ट धरला आहे बाजारात तशी स्कूल बॅग उपलब्ध होणे शक्यच नाही म्हणून मग त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या फाउंडेशन ची संपर्क करून आपल्या मुलांना हवी असलेली बॅग उपलब्ध करून दिलेली आहे यालाच लोकप्रियता म्हणायचे नाही का? यापेक्षा आणखी काय लोकप्रियता असू शकते? लोकांच्या घराघरापर्यंत आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचलेला युवा नेता म्हणून विश्वजीत गायकवाड यांच्याकडे पाहिले जात आहे ही त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेल्या कामाची पावती आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

विश्वजीत गायकवाड यांना पाहिल्यानंतर अनेक शाळेतील विद्यार्थी विश्वजीत दादा आम्हालाही तशीच बॅग द्या ना! असा हट्ट धरू लागली आहेत. महाराष्ट्रात 30000 हून अधिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आज विश्वजीत गायकवाड यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून दिलेल्या स्कूल बॅग पाहायला मिळत आहेत. गरिब आणि गरजूंना मदत, या भावनेतून ते मदत करत असले तरी, श्रीमंताची मुले हीच बॅग पाहिजे असा हट्ट धरू लागले आहेत. तेव्हा त्या हट्टासाठी, त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठी, त्या लहान मुलांचा दादा बनलेल्या विश्वजीत गायकवाड यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत हजारो विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप केले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed