दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं दि. 7 जुलै रोजी पहाटे निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

About The Author

error: Content is protected !!