नवभारत अचिव्हर्स अवॉर्ड्स पुरस्काराने ऋषिकेशदादा कराड दुबई येथे सन्मानित
लातूर : नवभारत मीडिया समूहाच्या वतीने युएई राजघराण्यातील वरिष्ठ सल्लागार डॉ अर्शी अयुब मोहम्मद झवेरी यांच्या शुभहस्ते लातूर येथील युवा उद्योजक तथा भाजयुमोचे प्रदेश सचिव ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांना “नवभारत अचिव्हर्स अवॉर्ड्स ” अंतर्गत नवभारत व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार 2024 हा पुरस्कार देऊन दुबई येथील हयात रिजेसी क्रीकसाइड या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान हॉलमध्ये 9 मार्च रोजी सन्मानपूर्वक कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीच्या समर्थनार्थ, नवीन भारताचे स्वप्न उराशी बाळगून सुरू करण्यात आलेला नवभारत हा भारत देशातील सर्वात मोठा मीडिया समूह आहे. देशभरातील विविध आवृत्तीच्या लाखो वाचकांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच समाज जीवनातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान नवभारत मीडियाच्या माध्यमातून दुबई येथे 9 मार्च 2024 रोजी करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात देशभरातील 27 जणांना नवभारत अचिव्हर्स अवॉर्ड्स 2023 हा पुरस्कार देण्यात आला त्यात लातूर येथील युवा उद्योजक ऋषिकेश रमेशआप्पा कराड “नवभारत अचिव्हर्स अवॉर्ड्स ” अंतर्गत नवभारत व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार 2024 हा पुरस्कार युएई राजघराण्यातील वरिष्ठ सल्लागार डॉ अर्शी अयुब मोहम्मद झवेरी यांच्या शुभहस्ते देऊन सन्मान करण्यात आला.
अध्यात्मिक, सामाजिक आणि वैचारिक विचाराचा पगडा असलेल्या कराड कुटुंबात जन्मलेले आणि या कुटुंबाचा संस्कार घेवून ऋषिकेशदादा कराड यांनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून शेतीवर आधारित कौशल्या सिल्क रिलिंग उद्योगाची उभारणी केली. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात भरारी घ्यावी या संकल्पनेतून भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रोत्साहन दिले. कौशल्या सिल्क रिलिंग उद्योगातून जवळपास १५० स्त्री-पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिला. या उद्योगावर आधारित बहुसंख्य शेतकऱ्यांची तुती लागवडीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न ऋषिकेशदादा कराड करीत आहेत. मराठवाड्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योगाची उभारणी केल्याने अनेकजण या प्रकल्पाची पाहणी करून पाठीवर कौतुकाची थाप देत आहेत. याबरोबरच गीर गाईंच्या दूध डेअरीमध्ये लक्षणीय कामगिरी दाखवत आहेत. आपल्या कर्तृत्वातून त्यांनी रामेश्वर येथील संत गोपाळबुवा महाराज शुगर अॅण्ड अॅग्रो फूड इंडस्ट्रीजचे ते संस्थापक संचालक असून, वायुपुत्र श्री हनुमान व्यायामशाळेचे सल्लागार आहेत. लातूर येथील श्रीधन्वंतरी वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून काम पाहत असतानाच गोरगरीब रुग्णांना वेळोवेळी एमआयटी
मेडिकल कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. अनेक वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित करून त्यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिली आहे.
सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न ऋषिकेशदादा कराड हे करत आहेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची त्यांच्यावर जबाबदारी असून तरुणांना बदलते शिक्षण, रोजगाराच्या संधी यासह विविध क्षेत्राशी निगडित सातत्याने चर्चासत्र मार्गदर्शन मिळावे घेत आहेत युवा चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नमो चषक कला क्रीडा स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणूनही त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धाचे नियोजन करून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.
विविध धार्मिक व सामाजिक कार्यातही सतत हिराणीने हिरीरीने भाग घेतात. या सर्व कामाची दखल घेऊन नवभारत मीडिया यांनी युवा उद्योजक ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांना “नवभारत अचिव्हर्स अवॉर्ड्स ” अंतर्गत नवभारत व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार 2024 हा पुरस्कार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल ऋषिकेशदादा यांचे अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.