स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमुळे मराठवाड्यातील नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल- ना. संजय बनसोडे

0
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमुळे मराठवाड्यातील नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल- ना. संजय बनसोडे

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमुळे मराठवाड्यातील नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल- ना. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठवाड्यामध्ये कुस्ती लोकप्रिय असून लातूर जिल्ह्यालाही कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. या मातीमध्ये रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार, अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांच्यासारखे अनेक दिग्गज कुस्तीपटू घडले आहेत. स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमुळे नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल आणि स्व. खाशाबा जाधव यांचे स्वप्न साकार करणारे खेळाडू मराठवाड्याच्या मातीत घडतील, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे 9 ते 12 मार्च या कालावधीत आयोजित स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिल्पाताई संजय बनसोडे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस, युवराज नाईक, जगन्नाथ लकडे, अर्जुन पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार, माजी आ. गोविंद केंद्रे, दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, राहुल केंद्रे, ट्रीपल केसरी पै. विजय चौधरी, पै. नामदेव कदम, पै. बापूसाहेब लोखंडे, पै. सय्यद चाऊस, पै. अस्लम काझी, समीर शेख, संग्राम पाटील, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
उदगीर तालुक्यातील खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा मिळाव्यात, याकरिता उदगीर तालुका क्रीडा संकुलासाठी १४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून याशिवाय तोंडार येथे ८२.३३ कोटी रुपये निधीतून अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील उत्कृष्ट कुस्तीपटू उदगीर नगरीत आले असून ग्रीक रोमन, फ्री स्टाईल आणि महिला गटातील कुस्ती पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेस उपस्थित राहून कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस यांनी केले. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू प्रदीप देशमुख यांनी उपस्थित खेळाडूंना शपथ दिली. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
उद्घाटन सोहळ्यात सनाऊल्ला खान जखमी…..
उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठाचा अंदाज न आल्यामुळे एम आय एम चे नेते सनाउल्ला खान हे व्यासपीठावरून पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *