उदयोत्सवात सादर झाल्या समाज प्रबोधन करणाऱ्या एकांकिका
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली. उद्घाटनानंतर पाच भाषेत सादर झालेल्या एकांकिकेतून समाज प्रबोधनाचा प्रयत्न करण्यात आला. कन्नड विभागातर्फे महात्मा बसवेश्वर आणि त्यांचे भक्त, उर्दू विभागातर्फे आजच्या पालकांना भेडसावणारे प्रश्न, हिंदी विभागातर्फे हुंडाबळी, इंग्रजी विभागातर्फे मोबाईलचे वेड तर सांस्कृतिक विभागातर्फे मोबाईल मुळे पालक आणि त्यांचे पाल्य यांच्यात होणारे मतभेद अशा विषयावर एकांकिका सादर झाल्या. सर्व एकांकिका समाजातील भेडसावणाऱ्या प्रश्नांना सादर करणाऱ्या होत्या, त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उकल करणाऱ्या आणि हृदयाला भिडणाऱ्या पद्धतीने सादर करण्यात आल्या. प्रेक्षकांनी सर्व एकांकिकांना भरभरून प्रतिसाद दिला. यासाठी सर्व भाषेचे विभाग प्रमुख त्यांचे सहकारी यांनी कार्य केले. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांचे मार्गदर्शन लाभले.