मास संघटनेच्या अध्यक्षपदी सुभाष गुंडिले तर सचिवपदी सतिषराव नामपल्ले
अहमदपूर (गोविंद काळे) : मातंग अस्मिता संघर्ष सेना अर्थात मास या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुभाष गुंडीले तर सचिवपदी सतिषराव नामपल्ले यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे ८ मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर तर व्यासपीठावर मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी,मासचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत तादलापुरकर,मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे, सचिव नारायण सोमवारे,ॲड.सतिश धनवाडे,प्रा दिलीपराव भालेराव,सेवानिवृत्त मुख्याध्यापक ग्यानोबा घोसे, बालाजी वाघमारे,मनोज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अहमदपूर मास संघटनेची नुतन तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.ती पुढिल प्रमाणे तालुकाध्यक्ष- सुभाष गुंडीले, सचिव -सतिषराव नामपल्ले, उपाध्यक्ष- भानुदास कंचकटले, प्रविण जंगापल्ले, व्यंकट कसबे, शिवाजी पिटाळे, कार्याध्यक्ष- वशिष्ठ कांबळे, सहसचिव- जिवारे सोमनाथ जयसिंग, कोषाध्यक्ष- रामनाथ पलमटे, सहकोषाध्यक्ष -जयसिंग वाघमारे, संघटक -भारत नामपल्ले, शुभम कांबळे, मनोहर सुर्यवंशी, सरपंच शिवाजी तरुडे, मुरहारी पोतवळे आदींचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राजाभाई सूर्यवंशी म्हणाले की कर्मचारी हा समाजाचा आर्थिक कणा असतो. हाच वर्ग समाज निर्मितीसाठी हातभार लावू शकतो. नुतन मास संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी जात , भेद, वर्ण विसरून तनमनधनाने वंचित उपेक्षित बहुजन वर्गाचे काम करावे.यावेळी आपल्या मनोगतात मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे म्हणाले की, संघटना वाढीसाठी तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहचणे गरजेचे असून समाजातील अडीअडचणी, समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.अध्यक्षीय समारोप भाषणात नरसिंग सांगवीकर यांनी अहमदपूर तालुक्याला महापुरुषांच्या विचारांचा वैचारिक वारसा असून हा वारसा सर्वानीच पुढे नेण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले.प्रास्ताविक मधुकर इबीद्रे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी तर आभार हणुमंत सोमवारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान सुर्यवंशी, गजानन गुंडीले, रामकिशन गोरले, माधव राजपंगे, संतोष सूर्यवंशी, संभाजी गुंडीले, कोंडीबा गायकवाड आदींनी परीश्रम घेतले.