पुस्तकी ज्ञानाबरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी घडवणारे अभिनव स्कूलचे उपक्रम – आनंद जाधव
निलंगा (प्रतिनिधी) : अभिनव प्री प्रायमरी स्कूल च्या माध्यमातून वर्षभर चालवलेल्या उपक्रमामधून संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे कार्य होत असल्याचे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आनंद जाधव सर यांनी बोलून दाखवले.
निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृह नगरपरिषद निलंगा येथे आयोजित अभिनव प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल च्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष आनंद जाधव, डॉक्टर उद्धव जाधव, पत्रकार हरिभाऊ सगरे, मराठा सेवा संघाचे विनोद सोनवणे, मुख्याध्यापक मोहन नटवे संचालक नितीन जाधव हे मंचावर उपस्थित होते यावेळी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव मुख्याध्यापक मोहन नटवे पत्रकार हरिभाऊ सगरे यांनी आपले विचार मांडले यावेळी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा जाधव ताई यांनी शाळेचे उपक्रमाची माहिती देत वर्षभरामध्ये आपल्या उपक्रमाद्वारे प्रबोधन करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी ऐतिहासिक शिवकालीन देखाव्यासह लावणी भावगीत कपल डान्स विविध नृत्य अत्यंत उत्तम रित्या सादरीकरण करून आपल्या कलागुणांना मंचावर सादर करीत पालक प्रेक्षकासह प्रमुख पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून सोडले यावेळी शाळेचे संचालक नितीन पंढरीनाथ जाधव सौ मंजुषा जाधव,सहशिक्षिका ज्योती मनाळे,पुनम वाघे,मुस्कान शेख,अश्विनी अंबुलगेकर,भाग्यश्री पेठकर,वाहक नितीन बनसोडे,गुंडू पवार,रवी काळे आदी कर्मचारी वृंदांच्या वतीने अफाट परिश्रम घेऊन या चिमुकल्यांचे सराव घेत आज मंचावर त्यांचे सादरीकरण करून घेतले यामुळे सर्व पालक वर्ग व प्रेक्षकांमधून कर्मचारी व चिमुकल्यांचे कौतुक करण्यात येत होते.