राष्ट्रीय इव्हेंट परिषदेच्या सदस्य पदी टाईम स्क्वेअर इव्हेंट्स चे सर्वेसर्वा शैलेश रेड्डी यांची निवड

0
राष्ट्रीय इव्हेंट परिषदेच्या सदस्य पदी टाईम स्क्वेअर इव्हेंट्स चे सर्वेसर्वा शैलेश रेड्डी यांची निवड

लातूर (प्रतिनिधी) : मराठवाड्याचे सुपुत्र टाईम स्क्वेअर इव्हेंट आणि एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीचे शैलेश रेड्डी यांनी गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर आपल्या कार्यातून स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी इव्हेंट या व्यावसायाला ” इव्हेन्ट इंडस्ट्री ” म्हणून मराठवाड्यात सर्व प्रथम ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर ई.मा शी (इव्हेंट अँड एन्टरटेन्मेंट मॅनेजमेंट) सलग्न असलेली राष्ट्रीय इव्हेंट परिषद म्हणजेच COREA 2.0 चे अधिवेशन 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी ओरिसातील कोणार्क येथे पार पडले.या अधिवेशनात शैलेश रेड्डी यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा पद्धतीची हि मराठवाड्यातील पहिलीच निवड आहे. या नियुक्तीमुळे मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या आधी ” बिझस्टार्ट ” या नामांकित आंतरराष्ट्रीय पोर्टलवर तज्ञ सल्लागार म्हणून शैलेश रेड्डी यांची निवड झाली असून तसेच RBN रेड्डी बिझिनेस नेटवर्क साऊथ इंडिया चा यंग बिझिनेस Entrepreneur पुरस्कार आणि झी २४ तास चा नामांकित Idea Master ह्याही पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे .

मराठवाड्यातील इव्हेन्ट इंडस्ट्रीमध्ये माणसांचा योग्य मेळ बसवणारे ” रत्नपारखी ” म्हणून शैलेश रेड्डी ख्यातनाम आहेत. ” टाईमस्क्वेअर इव्हेंट व 24 the meeting hub” या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील इव्हेंट आणि Startup क्षेत्रात क्रांती केली आहे. लग्न सोहळे व इतर कार्यक्रमात सूत्रबद्धता आणली. सोबतच साउंड, लाईट, डेकोर, स्पेशल इफेक्ट्स, केटरिंग, डॉक्युमेंट्री, शॉर्टफिल्म्स, इंटरनॅशल आर्टिस्ट मॅनेजमेन्ट, सेलेब्रिटी मॅनेजमेन्ट मध्ये त्यांचा हातखंडा आहे. मराठवाडा तसेच कर्नाटक आंध्रा सीमाभागातील तरुणांना स्वयं रोजगार निर्मिती व उद्योग उभारणीसाठी त्यांनी मोलाची मदत केली आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, मनोरंजन क्षेत्रातही इव्हेन्टच्या माध्यमातून त्यांची प्रभावी कामगिरी सुरु आहे. ग्रामीण व शहरी भागातील इव्हेंट व्यवसायाला ” इव्हेन्ट इंडस्ट्री ” म्हणून मराठवाड्यात सर्व प्रथम प्रस्थापित करणारे लातूरचे शैलेश रेड्डी हे सर्वदूर परिचित आहेत.

मराठवाड्याच्या भुमिपुत्रांचा खरा आवाज ठरेल असा व्यापार / IT / शिक्षण / कला /आरोग्य/ क्रीडा / संस्कृती / पर्यावरण उद्योग – या विषयांना घेवून काम करण्यासाठी त्यांच्या संकल्पनेवर आधारित लातूर आंध्रा तेलंगणा कॉरिडॉर म्हणजेच एका छोट्या शहराने दोन राज्यासोबत होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिल्याच कॉरिडोरची संकल्पना मांडणारा अवलिया म्हणजेच शैलेश रेड्डी.

शैलेश रेड्डी यांची COREA 2.0 परिषदेच्या अधिवेशनात सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यामुळे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून त्यांचे स्वागत होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *