बालकांना पोलिओ डोस
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज पाच वर्षाखालील अहमदपूर येथील बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ ही यंदाच्या पल्स पोलिओ मोहिमेची टॅगलाईन आहे. या विषयीची सविस्तर माहीती अशी की, आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत नालंदा इंग्लिश स्कूल टेंभुर्णी रोड, अहमदपूर येथे राबविण्यात आली.यावेळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम बूथ प्रमुख नावसाबणे सतीश यांच्यासह निराधार कमीटीचे सदस्य फिरोजभाई शेख, मद्देवाड नंदकुमार, सदस्य तेलंगे पूजा, नागरगोजे अपेक्षा, वाघमारे अंजली, ताडमे नंदिनी, आदींचा सहभाग होता.