वृक्षारोपण करुन साजरा केला वडिलांचा वाढदिवस आणि पेपरचा वर्धापन दिन
वाढवणा (प्रतिनिधी) : वाढदिवस आणि पेपरचा वर्धापन दिन म्हणटले की मोठा कार्यक्रम आला, मोठा खर्च आला आणि लोकांची गर्दि आली.या सर्व गोष्टीला फाटा देत वृक्षारोपन करुन वडिलांचा वाढदिवस आणि पेपरचा वर्धापन दिन केला साजरा करुन एक आदर्श निर्माण केला.
दैनिक बालाघाटचा आवाज या पेपरचा तिसरा वर्धापन दिन आणि आपले वडिल उदगीर वकिल संघाचे सदस्य जेष्ठ विधीज्ञ दिगंबरराव बिरादार यांच्या वाढदिवस याचे औचित्त साधून पेपरचे संपादक तथा विधीज्ञ प्रमोद बिरादार यांनी सध्याच्या काळात ज्याची गरज आहे ते जाणून घेऊन वृक्षारोपन केले. वास्तविक पहाता दैनिक बालाघाटचा आवाज या पेपर ची सूरुवात ७ जूलै २०१८ या दिवशी म्हणजेच संपादक प्रमोद बिरादार यांचे वडिल जेष्ठ विधीज्ञ दिगंबरराव बिरादार यांच्या वाढदिवसा दिवस होता.त्याचेच औचित्त साधून या पेपरची सुरुवात केली.या पेपरला सुरु करुन आज तिन वर्षे झाले. “इवलेसे रोप लावीयले द्वारे तयाचा वेणू गेला गगणावरी” या प्रमाणेच या दैनिकाने आजवर गोर गरिबांच्या प्रश्नाला वाचा फोडून राज्या बाहेर हि आपले नाव घेऊन गेले आहे.
८ मार्च २०२१ रोजी गोवा येथे आंतरराष्ट्रीय महिलांच्या विवीध स्पर्धेचे आयोजन शांतिदूत प्रोडक्शन च्या डायरेक्टर अनिता राठोड यांनी केले होते.त्या स्पर्धेचे मिडीया पार्टनर म्हणुन या दैनिकाने तेथे हि उत्कृष्ट कार्य करुन आपले नाव तेथेही गाजवले.अशा या “दैनिक बालाघाटचा आवाज” पेपरचा वर्धापन दिन आणि वडिल दिगंबरराव बिरादार यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून बुधवारी वाढवणा बु येथे जेष्ठ विधीज्ञ दिगंबरराव बिरादार, स.पो.नि.बाळासाहेब नरवटे, प्रा.शाम डावळे,सरपंच नागेश थोंटे, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ सोनु क्षिरसागर,ग्राम विकास अधिकारी उमाकांत ढोबळे, संपादक प्रमोद बिरादार,राष्टवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस अनवर हावलदार,बालाजी काळे,संतोष सोमासे,सुनिल खिडसे, महेबूब ठाणे, आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.