भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सरदार गुलाबसाब शेख यांची निवड
देवणी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ग्रामीण लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये देवणी तालुक्यातील गुरणाळ येथील शेख सरदार गुलाब यांच्या सामाजिक कार्याबद्दल व राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करून शहरी व ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती करून शासनाच्या सर्व योजना गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचणे व त्यांना योग्य लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून लाभ मिळवून देण्याचे उल्लेखनीय कार्य करत असल्याचे बघून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन माननीय जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी सरदार गुलाबसाहब शेख यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण या पदावर नियुक्ती करून नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.