वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उदगीरात जिव्हाळा वाचन कट्टा

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उदगीरात जिव्हाळा वाचन कट्टा

उदगीर (प्रतिनिधी) : वाचनानी माणूस डोळस बनतो व दुरदृष्टी प्राप्त होते म्हणून वाचन  संस्कृती जोपासण्यासाठी येथील जिव्हाळा ग्रुपने स्व.रुक्मिनबाई तुकाराम लहाने व स्व. ह. भ. प. तुकाराम संभाजी लहाने यांच्या स्मरणार्थ वाचन कट्टा सुरू केला आहे. या वाचन कट्याचे उद्घाटन अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक संस्थेचे अधिष्ठाता डॉ.अनिल भिकाने यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी अशोकराव हाळे होते. सदरील कार्यक्रमात प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने व वैजनाथराव पंचगल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त तर सामाजिक कार्यात धावून येणारे श्री हावगीराव आचारे यांचा सामाजीक योगदाना बद्दल सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री विश्वनाथ मुडपे व श्री दशरथ शिंदे यानी मनोगत व्यक्त केले. विश्वनाथराव माळेवाडीकर, सोपानराव माने, शरणप्पा खेळगे, चंद्रकांत रोडगे, विवेक होळसंबरे, सुभाष तगाळे, नवनाथ पाटील, व्ही एस कुलकर्णी, विक्रम हालकीकर, चंद्रकांत उप्परबावडे, मारोती रोडगे, राजकुमार बिरादार, सचिन बापुरे, चंद्रकांत पांचाळ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक रमाकांत बनशेळकीकर यांनी  केले. वाचन कट्यास डॉ. लहाने, श्री पंचगल्ले व श्री होळसंबरे यांनी आर्थिक मदत व पुस्तके दिल्याबद्दल या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन पांडुरंग बोडके यांनी मानले.

About The Author