वैजनाथ झुकलवाड  यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोगनिदान शिबिर संपन्न

वैजनाथ झुकलवाड  यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोगनिदान शिबिर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुरदाळ येथे सरपंच वैजनाथ झुकलवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. व्यंकटेश वट्टमवार सर व प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत नवटक्के सर, नंदकुमार पटणे (उपसरपंच) उपस्थित होते. सर्व रोग निदान शिबिर निखिलेश्वर क्लिनिक व मधुर डायबिटीज सुपरस्पेशालिटी सेंटर यांच्या माध्यमातून घेण्यात आले.या वेळी ११२ जणांची मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी करण्यात आली, तर यामध्ये २१ नवीन मधुमेही रुग्ण आढळून आले. मधुमेहाची व रक्तदाबाची चाचणी सुनील पाटील, रामेश्वर फुलारी यांनी केली. या कार्यक्रमावेळी राजकुमार वाघे ,राजकुमार बिरादार ,शंकर भातमोडे, राम शिळवणे,बाबासाहेब पाटील,शिवराज पाटील,राहुल कारामुंगे, संजय गायकवाड,बाळू नागठाणे ,गणेश मोरतळे,सदानंद बिरादार ,सखाराम पाटील, जितेंद्र कांबळे, बालाजी कांबळे, रमेश गायकवाड, सुरेश अण्णा कारामुंगे व गावातील सर्व मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शेतीची कामे जोरदार चालू असतानासुद्धा शिबिराचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता येत्या काळात आरोग्यदायी शिबीर घेण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार पटाने (उपसरपंच) सरांनी केले.

About The Author

error: Content is protected !!