राष्ट्रवादी युवक काँग्रेस उदगीर शहरच्या वतीने रस्ते दुरुस्तीची मागणी 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस उदगीर शहरच्या वतीने रस्ते दुरुस्तीची मागणी 

उदगीर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील प्रभाग 8 किल्ला रोड ( डाकुल वेस ) ते किल्ला पर्यंत, आर्य समाज समोरील , जी.ए. फंक्शन हॉल ते होळी गल्ली रोड , पारकट्टी गल्ली मधील रोड , चिल्लरगे गल्ली मधील रोड, मुक्कावार गल्ली प्रमुख रस्त्यावर पाईपलाईनसाठी मोठया प्रमाणात खड्डे खोदण्यात आलेले आहेत . या भागात मोठया प्रमाणात रहदारी आहे, या भागात शाळा, मंगल कार्यालय व ऐतिहासिक किल्ला या भागातील नगरसेवकांना व न. प. कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना वारंवार सांगुन सुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे.खड्डे बुजवणे तिकडेच राहीले पण अतिरिक्त पाईप त्वरीत काढून घेण्यासाठी कार्यवाही व्हावी,अन्यथा न.प. च्या विरोधात तिव्र आंदोलन करावे लागेल. असे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद यांना व नगराध्यक्ष याना देण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय शेटकार, कार्यअधक्ष आजम पटेल, उपाध्यक्ष प्रशांत हुडगे, उपाध्यक्ष सागर सोनाळे, उपाध्यक्ष आखीब शेख, उपाध्यक्ष रोहीत कांबळे, उपाध्यक्ष सिकंदर शेख,सचिव शाम पाटमासे, सह सचिव गोपाळ बिरादर, शंकर मुक्कावार, संगमेश्वर काळा, कुमार चौधरी,शुभम शेटकार, अभिषेक अंबरखाने,शिवा कोटलवार राहुल शेटकार,कृष्ण पारसेवार, अभिजीत चौधरी, उमादेवी बिरादार ई. उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!