महावाचन उत्सव 2024 अंतर्गत गट साधन केंद्र अहमदपूर येथे तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन

0
महावाचन उत्सव 2024 अंतर्गत गट साधन केंद्र अहमदपूर येथे तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन

महावाचन उत्सव 2024 अंतर्गत गट साधन केंद्र अहमदपूर येथे तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन

अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दि.५ सप्टेंबर रोजी गटसाधन केंद्र अहमदपूर येथे महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत तालुक्यास्तरीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रथं प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड, तर प्रमुख उपस्थिती गटशिक्षणाधिकारी बबन ढोकाडे , राज्य पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक महादेव खळुरे, मु. अ. एन.टी. कदम, केंद्रीय प्रा.शा. मू. अ. दत्तात्रय गुरमे, विभाग प्रमुख कामाक्षी पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी डाँ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करुन ग्रंथ प्रदर्शनाचे आंदेलवाड साहेबांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अहमदपूर केंद्राचे केंद्रप्रमुख तथा गट समन्वयक मठपती , उपक्रमशील शिक्षिका शिंदे तसेच गट साधन केंद्र अहमदपूर येथील विषय साधन व्यक्ती मनीषा गुणाले, इंदुमती जोगदंड, राम चामे, विशेषतज्ञ चंद्र कांत मोघे, नामदेव बिलापट्टे , विशेष शिक्षक हनुमंत सोमवारे . डिकळे, संतोष जाधव, अनिता सुरवसे.सय्यद सिद्दिकी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामाक्षी पवार यांनी केले प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी रोकडे यांनी केले. प्रशाला अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले. के. प्रा.शा.अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च पदावर गेलेल्या महान व्यक्तींची वेशभूषा धारण करून शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
गटविकास अधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना पुस्तक वाचनाचे महत्त्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या ग्रंथ प्रदर्शनात जवळपास 3500 पुस्तकांची यथोचित्त मांडणी करण्यात आली होती. अहमदपूर शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली. उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीमती इंदुमती जोगदंड यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed