प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळकोट- उदगीर विधानसभा अध्यक्ष पदी सुर्यभान चिखले यांची निवड

प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळकोट- उदगीर विधानसभा अध्यक्ष पदी सुर्यभान चिखले यांची निवड

उदगीर ( प्रतिनिधी ) : ना.बचूभाऊ कडू यांच्या  व महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या आदेशानुसार  जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे , तालुका अध्यक्ष – रविकिरण बेळकुंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर -जळकोट विधानसभा उदगीर च्या विधानसभा अध्यक्ष पदी सूर्यभान चिखले मामा यांची निवड तर महादेव आपटे यांची उदगीर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड केली.  अविनाश शिंदे यांची तालुका सचिव पदी निवड करण्यात आली, प्रशांत आडे यांची शहर- चिटणीस पदी निवड झाली.

या वेळी सुनील कांबळे , हाश्मी सय्यद उमेर , शेख जुयेब अहमद , दुराणी नासेर खान , यांचा जाहीर पक्ष प्रवेश झाला.या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष – विनोदभाऊ तेलंगे , तालुकाध्यक्ष- रविकिरण बेळकुंदे ,शहरअध्यक्ष – रियाज शेख , तालुका उपाध्यक्ष – संदीप पवार , तालुका उपाध्यक्ष – महादेव मोतीपवळे ,ता. सहसंपर्क प्रमुख – सुनील केंद्रे , शहर संपर्क प्रमुख – चंद्रकांत भोसगे , सह संपर्क प्रमुख -सुनील केंद्रे ,शहर सहसचिव -बालाजी बिरादार ,उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, निळंकठ मुदोळकर ता.प्रसिद्धी प्रमुख अभय कुलकर्णी, ता. चिटणीस – गोपाळ नवरखेले, सह सचिव – संगम वडले , ता.चिटणीस- रवी आदेप्पा , ता.कोषाध्यक्ष -लखन कांबळे, ता.सरचिटणीस – सुदर्शन सूर्यवंशी ,प्रहार महिला आघाडी तालुका अध्यक्ष कांचन भोसगे , उपाध्यक्ष -विजयमाला पवार , उपाध्यक्ष – सुजाता दावरे, कार्याध्यक्ष – शकुंतला रोडेवाड ,लता कोळी ,जयश्री चव्हाण, शिलावती बिरादार, विजयालक्ष्मी बिरादार ,विजयमाला हारगे, उषा हारगे ,कुमोदींनी पांचाळ , रचना हल्लाळे यांच्या सह अनेक प्रहार सेवक उपस्थित होते. यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवुन प्रहार सेवकांच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Author