मराठा आरक्षणासाठी पती पत्नीने विषारी औषध पिऊन उचलले टोकाचे पाऊल….. !

0
मराठा आरक्षणासाठी पती पत्नीने विषारी औषध पिऊन उचलले टोकाचे पाऊल….. !

मराठा आरक्षणासाठी पती पत्नीने विषारी औषध पिऊन उचलले टोकाचे पाऊल….. !

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हासरणी येथील ज्ञानोबा तिडोळे व चंचलाबाई तिडोळे या पती पत्नी यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 6 वेळा उपोषण केले., मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही..तसेच मराठ्यांना आरक्षण दिले नाही, याच नैराश्यातून पती-पत्नीने दि २५ सप्टेंबर रोजी बुधवारी विषारी औषध पिऊन हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान वेळीच त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे..

अहमदपूर तालुक्यातील हासरणी येथील रहिवाशी असलेले ज्ञानोबा मारोती तिडोळे व चंचलाबाई झानोबा तिडोळे या पती पत्नी यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागील वर्षात पाच वेळा आंदोलने केली होती परंतु काही आरक्षण मिळाले नाही त्यातच जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे दि १७ सप्टेंबर रोजी आरक्षणासाठी सहाव्यांदा आमरण उपोषणासाठी बसले होते जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी तालुक्यातील हंगारगा येथील जयराम पवार हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अहमदपूर येथे आमरण उपोषणास बसले असत या आमरण उपोषण आंदोलनात ज्ञानोबा तिडोळे सहभागी होते ते नेहमीच मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असायचे दि २५ सप्टेंबर रोजी बुधवारी अंदाजे ८ : ३० ते ९ : ०० च्या दरम्यान मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सोडल्याची माहीती कळताच सहा वेळा उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही..तसेच मराठ्यांना आरक्षण दिले नाही, आता आपल्या अकरावीत शिकत असलेल्या मुलीचे तसेच दोन लहान मुलांचे आता कसे होईल याच नैराश्यातून आपली बहीण इंदुबाई तुकाराम हेंडगे चुलत भाऊ व इतर नातेवाईकांना फोन करून आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहोत असे सांगुन पती-पत्नीने दि २५ सप्टेंबर रोजी बुधवारी संध्याकाळी ९ : ०० वाजण्याच्या दरम्यान विषारी औषध पिऊन हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान वेळीच त्यांना अहमदपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना देशमुख हॉस्पीटल या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असुन त्यांच्यासाठी सुरवातीचे ४८ तास महत्वाचे असल्याचे डॉ.धिरज देशमुख यांनी सांगितले आहे..

घटनेची माहीती समजताच अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुंबई येथून फोन वरून डॉक्टरांशी संपर्क साधून पती पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली.

माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, प्रशांत भोसले आदी सह सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी हॉस्पीटला भेट देऊन चौकशी केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!