सरदार वल्लभ भाई पटेल शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

0
सरदार वल्लभ भाई पटेल शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

उदगीर (एल.पी.उगीले)
राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे शिक्षिका अनुराधा धोंड, पर्यवेक्षक प्रशांत पाटील उपस्थित होते.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार सातवी वर्गातील विद्यार्थिनी प्रणिती राठोड हिने फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन केला.प्रमुख पाहुणे अनुराधा धोंड यांचा सत्कार गौरवी सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी फेटा व पुष्पगुच्छ देऊन केला. प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील यांचा सत्कार शिंदे या विद्यार्थिनीने फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन केला. शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांचे भाषण घेतले. त्यात बालवाडी गटातून विरा जामकर, कृष्णा वाले ,मानसी गडपे, आर्वी मनुकर व प्रतिज्ञा बेळकिरे, नंदिनी उकंडे , मणियार फैजान, मोनिका शिंदे यांनी भाषण केले . इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त लेझीम गीत सादर केले. व इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी व बालवाडीतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले .तसेच इयत्ता सातवी वर्गातील भाग्यश्री हिने काठी प्रात्यक्षिक खूप सुंदर सादर केले .शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेली नृत्य, भाषण, काठी प्रदर्शन या सर्व विद्यार्थ्यांना नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने वह्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या .बालवाडीतील विद्यार्थिनी सानवी दमकुंडवार ही विद्यार्थिनीने छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये आली होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण केल्याबद्दल कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थिनी सोनाली म्हेत्रे व प्रणिती राठोड या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन व आभार सादर केले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!