शिवाजी महाविद्यालयात उर्दू विभागातर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

0
शिवाजी महाविद्यालयात उर्दू विभागातर्फे निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) शिवाजी महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सहकार्याने, विद्यार्थ्यांच्या लपलेल्या कला गुणांना चालना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त उर्दू भाषेत निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये बीए, बी.कॉम, बी.एस्सी, प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. निबंध लेखनासाठी त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्व आणि राजकारण” हा विषय दिला होता. या कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. व्ही.एम. पवार,मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईचे सदस्य डॉ. एन.ए. कदम, वाणिज्य विभागाचे प्रा. डी.बी. कोनाळे, उर्दू विभागाचे प्रा. डॉ. शेख मेहबूब आणि उर्दू विभागाचे अध्यक्ष डॉ.नदाफ मुहम्मद फय्याज व्यासपीठावर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे यांनी निबंध लेखन स्पर्धेत उर्दू विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, भविष्यात उर्दू शिक्षकांनी मागितलेला कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मी देईन. मला माहिती आहे की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता आहे, फक्त त्यांना समोर आणण्याची गरज आहे.प्राचार्य म्हणाले की, मी लहानपणापासूनच उर्दूशी जोडलेला आहे. आणि माझ्या मित्रांमध्ये आणि ओळखींमध्ये उर्दू भाषिकांची संख्या मोठी आहे. यावेळी एक कविता त्यांनी सादर केली.
कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. शेख मेहबूब म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यांना उजागर करण्याचा निबंध लेखन हा सर्वोत्तम मार्ग आहे. उर्दू विगाचे अध्यक्ष नदाफ मुहम्मद फय्याज म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या लपलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी उर्दू विभागाने यापूर्वीही असे कार्यक्रम आयोजित केले आहेत, आणि भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित केले जातील. विद्यार्थ्यांना संबोधित करताना,वाणिज्य विभागाचे प्रा. डी.बी. कोनाळे यांनी मीर तकी मीर यांची कविता अतिशय सुंदर पद्धतीने सादर केली, आणि सांगितले की उर्दू ही एक गोड भाषा आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक कविता सादर केली.
आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. व्ही.एम.पवार म्हणाले, आमचे महाविद्यालय गंगा-जमनी संस्कृतीचे एक उदाहरण आहे, जिथे प्रत्येक धर्म आणि राष्ट्राचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने ज्ञान मिळवतात. हे महाविद्यालय कोणत्याही एका धर्माचे,राष्ट्राचे किंवा पंथाचे महाविद्यालय नाही. याला नॅक समितीनेही पुष्टी दिली आहे.
या निबंध लेखन स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढून त्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक शेख सना बी ए तृतीय वर्ष, द्वितीय क्रमांक बी ए प्रथम वर्षाची सना शफी तर तृतीय क्रमांक पटेल नेहा अलीम बी ए एस वाय यांना प्राप्त झाले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.शेख एम.एन.तर आभार डॉ.नदाफ एम.एफ.यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!