समशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले): मराठी भाषेतील गझलकार आणि मोठे कवी म्हणून नावाजलेले सुरेश भट्ट यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने जगणे आणि मरण्याबद्दल विचार मांडले आहेत. ते म्हणतात इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते…..
मात्र उदगीर परिसरातील नागरिकांना मरणानंतरही सुटका नाही. अशीच अवस्था निर्माण झाली आहे. मरणानंतरही प्रेताची अवहेलना चालूच आहे. अशी विचित्र परिस्थिती कुठे स्मशानासाठी रस्ता नाही म्हणून तर कुठे स्मशानभूमीच नाही म्हणून निर्माण होऊ लागली आहे.
उदगीर तालुक्यातील मौजे सुकणी येथील समशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले होते .पण त्या पत्राचे दखल घेतली गेली नाही. त्याचे कारणही मोठे गमतीशीर आहे, या गावात पूर्वी अंत्यसंस्कार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोडच्या कडेला अंत्यविधी करण्यात येत होती. परंतु आज रोजी सदर रोडचा विस्तार होत असल्यामुळे तेथे अंत्यविधीसाठी जागा शिल्लक राहिलेली नसल्यामुळे स्मशानभूमी साठी तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. अंत्यविधीसाठी जमलेला समाज रोडवर थांबत असल्यामुळे वाहना पासून माणसांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. एकाच्या अंत्यविधीला गेलेल्या व्यक्तीचाही अंत्यविधी तिथेच करून येण्याची दुर्दैवी वेळ ग्रामस्थावर येऊ नये या दृष्टीने लोकहिताचा विचार करून ही मागणी पुढे रेटली जात आहे.जात आहे. तरी सुकडी येथील समशानभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी. अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. वारंवार सरपंचास सांगून सुद्धा याचा काहीच विचार होत नाही, की सरपंच महसूल प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यास कुठे कमी पडत आहेत? तेही कळायला मार्ग नाही.तरी सरपंचाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करून स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून घ्यावी. करण माणसांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला अंत्यविधीसाठी जागा मिळत नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे. एवढ्या मोठ्या समाजाला अंत्यविधीसाठी जागा नाही.सर्व समाजातून खंत व्यक्त केली जात आहे.
सुकणी या गावच्या गंभीर समस्येचा विचार करून आ. संजय बनसोडे साहेब , जिल्हाधिकारी,पालकमंत्री या सर्वांनी लक्ष घालून समशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अशी जनतेची मागणी आहे. नाहीतर यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर अंत्यविधी करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे.
