सेवानिवृत्त सैनिकाचा दापेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

सेवानिवृत्त सैनिकाचा दापेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

औसा (प्रतिनिधी) : लष्करातून निवृत्त होऊन गावी परतलेल्या बहुतांश सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. औसा तालुक्यातील दापेगाव येथे मात्र निवृत्त होऊन गावात आलेल्या जवानाचे जंगी स्वागत करण्यात आले. वाजत गाजत गावातून मिरवणूकही काढण्यात आली.

औसा तालुक्यातील दापेगाव गावचे जवान नेताजी भानुदास लिंबाळकर यांना हा अनोखा अनुभव आला. लष्करातील सेवा पूर्ण करून ते गावात परतले आहेत. गावाच्या या सुपुत्राचे दापेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गावापासून दूर राहून लष्करात ३० वर्षे सेवा केलेल्या लिंबाळकर यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने लिंबाळकर हेही भारावून गेले.

८ जुलै रोजी हा स्वागत समारोह झाला असून ढोल ताशे व बॅन्ड पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .दापेगाव येथील नेताजी भानुदास लिंबाळकर हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. लिंबाळकर ३० वर्षे सेवा बजावून ते ३० जून २०२१ रोजी ते बबिना (झाशी, उत्तरप्रदेश ) येथे सेवानिवृत्त झाले. ८ जुलै रोजी त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

सेवानिवृत्त सैनिक नेताजी लिंबाळकर यांचा सत्कार चेअरमन मा श्रीपतराव काकडे , जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा श्री श्रीपतराव काकडे ,जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील ,
सरपंच गुलाबराव कावळे , सुग्रीव लोंढे ,सुरेश सोनटक्के ,
साधू वाघे ,शिवाजी सोनटक्के, तानाजी लिंबाळकर ,कमलाकर सूर्यवंशी, लहुजी शिंदे ,भालचंद्र माने, दिगंबर गायकवाड ,मीना लिंबाळकर ,वंदना गायकवाड , यांच्यासह दापेगाव
गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

मायभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीमधून सेवानिवृत्त झालो असलो, तरी देशसेवा ही शेवटच्या श्‍वासापर्यंत सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया लिंबाळकर यांनी व्यक्त केली.

About The Author