आमदार अभिमन्यू पवार यांचा लातूरकरांच्या वतीने भव्य सत्कार

आमदार अभिमन्यू पवार यांचा लातूरकरांच्या वतीने भव्य सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : औशाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचा लातूरकरांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.  या सत्कार समारंभात घडलेला एक प्रसंग अनेकांच्या मनाला भावला ओबीसी आरक्षण विषयी सभागृहात आक्रमकपणे बाजू मांडल्याबद्दल भाजप ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे पवार साहेबांचा भव्य सत्कार समारंभ योजला होता. त्यांच्या सत्कारासाठी भलामोठा पुष्पहार संयोजक श्री. रविशंकर केंद्रे, श्री दत्ता चेवले व श्री गौरव मदने व श्री निखिल गायकवाड यांनी बनवून घेतला. सत्कारप्रसंगी मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब म्हणाले की, महाराजांच्या पुतळ्यापुढे इतका मोठा पुष्पहार स्वीकारण्याइतपत मी मोठा नाही, हा पुष्पहार महाराजांच्या पुतळ्यालाच शोभून दिसेल असे नम्रपणे सांगून संयोजकांना तो हार महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करण्यास सांगितले. हा हार पुतळ्याला घालताना पवार साहेबांसह उपस्थित मावळ्यांनी परिसर महाराजांच्या जयघोषाने दणाणून सोडला. याप्रसंगी मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी मनोगत व्यक्त करातांना छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथील स्वागत समारंभाचे  संयोजक श्री. रविशंकर केंद्रे, श्री दत्ता चेवले, श्री गौरव मदने व श्री निखिल गायकवाड यांचे मनापासून आभार मानले तसेच आपण मागवलेला हार खूप सुंदर होता पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर इतका मोठा हार स्वीकारण्याइतका मोठा नसल्याने मी तो स्वीकारला नाही. असे ते शेवटी सांगितले.
                                                                            

About The Author

error: Content is protected !!