आडसाली ऊस लागवड शेतकऱ्यांच्या फायदयाची – आमदार बाबासाहेब पाटील

आडसाली ऊस लागवड शेतकऱ्यांच्या फायदयाची - आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपुर ( गोविंद काळे ) : मराठवाडया सारख्या डोंगराळ भागात आडसाली ऊस लागवड करणे अवघड बाव असली तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणे फायदेशिर असल्याचे प्रतिपादन पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी केले.
ते आयोजित केलेल्या झुम मिर्टीग च्या माध्यमातुन आडसाली ऊस लागवड व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्रामध्ये बोलत होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक कृषीरत्न संजीव माने आष्टा जि. सांगली यांचे झुम मिर्टीग माध्यमातुन ऑनलाईन मार्गदर्शन केले. या झुम मिटींग व्दारे आयोजित केलेल्या चर्चासत्र ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा कारखान्याचे व्यवस्थापकिय संचालक अविनाश जाधव साहेब यांनी यशस्वी व प्रभावीपणे राबविले. सदर चर्चा सत्रात सिध्दी शुगरचे व्हाईस प्रेसिडेंट पी.जी. होनराव, केन जनरल मॅनेजर पी.एल.मिटकर , ऊस विकास अधिकारी वाय.आर.टाळे, शेतकी स्टाफ व सिध्दी शुगरचे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

सिध्दी शुगरच्या कार्यक्षेत्रात आडसाली ऊस लागवडीचा शुभारंभ

सिध्दी शुगरच्या कार्यक्षेत्रात आडसाली ऊस लागवडीचा शुभारंभ माजीमंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांच्या हस्ते ऊस उत्पादक शेतकरी शरण शिवसांव चवंडा यांच्या शेतामध्ये ऊस रोपे लागवड करुन करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे , शिवसांव चवंडा , माधव माने , नामदेव सुरकुटे , संतोष कदम यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.सदर चर्चासत्रातील आडसाली ऊसाचे फायदे लक्षात घेवून येथील प्रगतशिल शेतकरी शरण चवंडा यांनी को- 86032 ऊस जातीची रोपे आडसाली ऊस म्हणुन लागवड केली आहे. तसेच या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवड करण्याचे नियोजन केल्याने कारखान्याच्या ऊस विकास विभागाअंतर्गत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे .

About The Author