बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची अमंलबजावणी व मार्गदर्शन केल्याबद्दल आत्माराम भेंडेगावकर यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार
अहमदपूर ( गोविंद काळे) जिल्हाधिकारी मुंबई शहर, बालविकास प्रकल्प अभियान व शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग यांचे संयुक्त विद्यमाने बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांतर्गत सतत दोन महिने कार्यक्रमाची अंमलजबावणी करणारे येथुन जवळच असलेल्या भेंडेगाव येथील रहिवाशी असलेले सध्या मुंबई येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत आत्माराम भेंडेगावकर यांचा जिल्हाधिकारी, राजीव निवतकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी मुंबई शहर, बालविकास प्रकल्प अभियान व शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग यांचे संयुक्त विद्यमाने बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांतर्गत अनेक विषयाचे ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. ज्यामध्ये मुलींचे स्वस्वरक्षनासाठी कराटे तसेच काही मानसिक आरोग्यासाठी योगा प्रशिक्षण, करिअर च्या दृष्टीने अनेक व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. सदरचे कार्यक्रम दिनांक 3 मे 2021 ते 3 जुलै 2021 या कालावधीत घेण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाची सांगता काल दिनांक 8 जुलै 2021 रोजी जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमात सतत दोन महिने कराटे व योगाचे प्रशिक्षण देणारे राम गुडमे, तंत्र सहायक भाऊसाहेब घाडगे, सदर कार्यक्रम आयोजित करून यशस्वीपणे राबवणारे व कार्यक्रमाची अमलबजावणी करणारे मार्गदर्शक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आत्माराम शंकर भेंडेगावकर, जिल्हा समनवयक श्रीमती माधवी इंगळे मॅडम यांचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले. सदर समारोपाच्या कार्यक्रमास शिक्षण निरीक्षक दक्षिण विभाग देविदास महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाल विकास प्रकल्प अभियानाचे प्रमुख श्रीमती शोभा शेलार यांनी केले. या कार्यक्रमास शून्य टक्के गळती असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये विशेष गुण प्राप्त करणार्या उत्कृष्ट गुणवंत विध्यार्थीनी चे रोख रक्कम व प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले दोन महिन्यात राबविण्यात आलेल्या सर्व वेबिनार व कराटे, योगा प्रशिक्षणाचे डिजिटल पद्धतीने अहवाल सादर करण्यात आले. श्रीमती माधवी इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानून माननीय अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने कार्यक्रम सम्पल्याचे जाहीर केले. यावेळी कोरोनाचे नियम पाळुन मुख्याध्यापक, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.