राजकुमार बिरादार (सरपंच)यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान व उपचार शिबीर संपन्न
उदगीर ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील बामणी येथील राजकुमार बिरादार (सरपंच )यांच्या वाढदिवसानिमित्त गावांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सहकारमहर्षी चंद्रकांत अण्णा वैजापुरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्रीकांत पाटील,गावचे भूमिपुत्र डॉ. धनाजी कुमठेकर , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित पाटील ,सुमन सर्जिकल हॉस्पिटलचे डॉ. महेश धुमाळे व डॉ प्रशांत नवटक्के होते.या वेळी डोळ्यांची तपासणी करण्यासाठी उदयगिरी लायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते .
या कार्यक्रमामध्ये मधुमेह व रक्तदाब कसे नियंत्रणात ठेवायचे? यावर मार्गदर्शन मधुर डायबिटीज सुपरस्पेशालिटीचे डॉ प्रशांत नवटक्के यांनी केले.एकूण १०६ लोकांवर मधुमेह व रक्तदाबाची चाचणी करण्यात आली. तर यामध्ये १७ लोकांना मधुमेह व रक्तदाबावर उपचार करण्यात आले.मधुमेहाची चाचणी केशव बिरादार ,सुनील पाटील यांनी केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक होळसब्ररे यांनी केली तर आभार प्रदर्शन सुनील(पिंटू) पाटील यांनी केले.सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त गावातील सर्व वरिष्ठ मंडळी व मान्यवरांनी सरपंचांना शुभेच्छा दिल्या व आरोग्य शिबिराचे आयोजन वारंवार गावात करण्यात यावे. अशी मागणी सुद्धा केली.