तारूण्य अवस्थेतील वादळाचे चित्रण म्हणजे मुळारंभ – सुरेखा गुजलवार.

तारूण्य अवस्थेतील वादळाचे चित्रण म्हणजे मुळारंभ - सुरेखा गुजलवार.

  उदगीर [एल. पी. उगिले] : मनुष्य जन्मानंतर जस जसे वय वाढत जाते तसतसे एकेक गोष्टी कळत जातात. तारूण्य अवस्थेत काही जास्तीच्या बाबी उदा.परिवारा सोबतचं वाढणं, मैत्री, प्रेमबंध, आप्तेष्टांच्या आणि स्वतःच्या ही मर्यादा जिथं कळतात, त्या तरूण वयाच्या अवस्थांतरातील वादळाचे चित्रण म्हणजे मुळारंभ हि कादंबरी होय. असे मत सुरेखा उदय गुजलवार यांनी व्यक्त केले.

         डॉ उदय गुजलवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गतच्या २४४ व्या वाचक संवाद मध्ये सुरेखा उदय गुजलवार यांनी डॉ आशुतोष जावडेकर लिखित मुळारंभ या कादंबरीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, वाढत्या तरुण वयात एक तर जग आपल्याला बदलवते किंवा आपल्यात तशी ताकत, ती उर्मी असेल तर आपण जगाला बदलवू शकतो. असे विचार देऊन तारुण्याची शक्ती जागृत करणारी कॉलेज जीवनाची उत्कंठा उजागर  करणारी कहानी मुळारंभ या कादंबरीत लेखकाने अत्यंत प्रभावीरीत्या मांडलेली आहे. त्या साठी सर्वांनी हि कादंबरी वाचली पाहिजे.

           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात व फेसबुक लाईव्ह संपन्न झालेल्या या संवादानंतर झालेल्या चर्चेत  मुरलीधर जाधव, बालाजी बिरादार, प्रा.गोपाळ पाटील, मोहन निडवंचे यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी अध्यक्ष,संवादकासह मान्यवरांचा ग्रंथभेट व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.उपस्थितांना जनमदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. शेवटी डॉ. उदय गुजलवार यांनी यथोचित अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजपाल पाटील यांनी केले तर आभार ऋषिकेश गुजलवार याने मानले. यशस्वीतेसाठी संयोजक अनंत कदम , बालाजी सुवर्णकार, बाबूराव सोमवंशी आदिंनी परिश्रम घेतले.

About The Author