ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नागझरी येथे वृक्षारोपण
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील जि. प. शाळा नागझरी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरीक सरपंच रामकिशन सूर्यवंशी होते तर प्रमुख म्हणुन उप जिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, जि.प.सदस्य माधवराव जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना गावचे उपसरपंच उध्दव ईप्पर म्हणाले की शाळेच्या रोड पासून गावापर्यंत रोडचे दोन्ही बाजूने, जि. प. मैदान, स्मशान भूमी येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गावात पाणी नाही कायम स्वरुपी पाण्याची सोय व्हावी, गावात वृध्द, विधवा, निराधार यांना पेंशनचा लाभ भेटावा. गावामध्ये घरकुलांचे जास्तीत जास्त लाभ धारक यांना वाटप व्हावे. अश्या गावातील अनेक समस्या कडे लक्ष वेधण्यात आले. मान्यवरांनी आमच्या गावाकडे जास्त लक्ष द्यावे अशी विनंती उपसरपंच यांनी केली
गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे म्हणाले की, महाराष्ट्रात औद्योगिक रणामुळे खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे ती भरून काढण्यासाठी वृक्षारोपण करणे व संगोपन करणे गरजेचे आहे. गावात जेवढी झाडे जास्त तेवढे गावातील नागरिकाचे स्वस्थ चांगले राहते असे प्रतिपादन केले. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले कि पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे तो राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे व त्यापेक्षा ही वृक्षांचे संगोपन करणे जास्त गरजेचे आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष खूप कमी प्रमाणत आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावावी लागणार आहेत असे मनोगत व्यक्त केले. जि.प सदस्य माधवराव जाधव म्हणाले की नागझरी हे तीर्थ क्षेत्र गाव आहे. अश्या ठिकाणी झाडे लावणे गरजेचे आहे कारण बाहेरून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात. गावचे उपसरपंच उध्दवराव ईप्पर यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे झाडे लावा झाडे जगवा असेही आवाहन केले. कार्यक्रमानिमित्त आलेल्या वरील सर्व मान्यवरांनी ग्रामपंचायतला जेवढे जमेल तेवढे सहकार्य करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी कृषीसहायक कलमे, कृषी सहायक नाईक, निराधार समिती सदस्य व्यंकट वंगे, श्याम पाटील, दयानंद पाटील, चंद्रकांत शिंगारे, ग्रामसेवक जगताप, शाळेचे मुखयाध्यापक कुंडगिर, सहशिक्षक राठोड हे उपस्थित होते. सूत्र संचलन प्रा. व्यंकटराव ईप्पर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक कुंडगिर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुण मंडळी व समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.