पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई

पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई

टोकवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण

पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी 57 हजारोंचे वीजबिल भरले

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी वाढदिवस साजरा करत असताना आपल्याच गावातील विद्यादान देणाऱ्या दालनाची रोषनाई करण्याचे काम केले आहे. थकीत विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देत जिल्हा परिषद शाळेची ५७ हजाराचे विजबिल सभापती बालाजी मुंडे यांनी भरले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपनही केले आहे.

परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार दि.09 जुलै रोजी त्यांचे मुळगाव असलेल्या टोकवाडी येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, महावितरणचे देवकर, ग्रामसेवक क्षीरसागर मँडम, उपसरपंच सुरेश रोडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुनील मुंडे, लहुदास मुंडे, माधवराव मुंडे, मदन काळे, आश्रोबा काळे, भानुदास मुंडे, गंपू पारधे, व सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व कर्मचारी, व ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सभापती बालाजी मुंडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. राजाराम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील परिसरात हायमास्ट बसविण्यात आले आहेत. टोकवाडी येथे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांचे दोघांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यांच्या दोघांच्याही कामाचे कौतुकास्पद आहे.
परंतू केवळ सत्कार न घेता बालाजी मुंडे यांनी टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या थकलेल्या विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देण्याचे काम केले. तब्बल ५७ हजार रूपयाचे थकीत विजबिल बालाजी मुंडे यांनी भरून ज्ञान दान देणाऱ्या दालनाला रोषनाई देण्याचे काम केले. एवढेच नव्हेतर वृक्षारोपन करून पर्यावरणाचे संगोपन करण्याचा देखील त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रयत्न केला. त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतूक गावकऱ्यांनी करत बालाजी मुंडे व त्यांच्या पत्नीचा जोरदार सत्कार करत त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. यावेळी गावकऱ्यांसोबत बोलताना बालाजी मुंडे म्हणाले की, मी माझ्या गावाच्या विकासासाठी आणि गावकऱ्यांच्या चांगल्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहिल. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला भरभरून निधी आला असून तो निधी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी खर्च करण्यास पंचायत समितीच्या मार्फत मी सदैव तत्पर राहिल, माझ्या गावात माझा झालेला सत्कार हा मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

About The Author