ओळखपत्रशी चेहऱ्याची ओळख पटल्याशिवाय मतदानास परवानगी देऊ नये – विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजूर अहमदपूर

0
ओळखपत्रशी चेहऱ्याची ओळख पटल्याशिवाय मतदानास परवानगी देऊ नये - विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजूर अहमदपूर

ओळखपत्रशी चेहऱ्याची ओळख पटल्याशिवाय मतदानास परवानगी देऊ नये - विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजूर अहमदपूर

अहमदपूर (गोविंद काळे) : दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील 236 अहमदपूर चाकुर विधानसभा मतदारसंघात होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी नकाब, कपडा इत्यादी नसावा व बुथ वरील अधिकाऱ्यांनी ओळखपत्र पाहूनच 100 टक्के ओळख पटल्यानंतरच मतदानाची परवानगी द्यावी. जर संशय आल्यास राजकीय पक्षांच्या बुथ प्रमुखांशी खात्री करुन घ्यावी. तसेच मतदान केंद्रावर विनाकारण गर्दी होणार नाही याची सुध्दा काळजी घेण्यात यावी व तसेच मतदान शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्र क्र. 96,97,99,100,101,108,109,110,111,112,113,115,122, 123,124,125,126,127,128,129,20,21,22,26,58,59,130,192,193,194,195,196,197,198,199,204,205,206,207,208,210,271,272,275,276,277,278,279,281,283,286,349,351,353,354,
355,356,357,358, या बुथवरील सि.सी.टी.व्ही. कॅमे­यामध्ये ओळख पटवण्याची संपुर्ण शुटींग करण्यात यावी. तसेच ओळख न पटवण्यासारखे कृत्य आढळुन आल्यास सदरील व्हिडीओ शुटींग आम्ही पुरावा म्हणुन आवश्यकतेनुसार मागणी करु असे एक निवेदन मा. निवडणुक निर्णय अधिकारी, 236 अहमदपूर चाकूर तथा उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय कार्यालय, अहमदपूर यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने देण्यात आले.
सदर निवेदनावर मधुकर धडे, अँड.स्वप्नील व्हत्ते, खंडेराव टिकोरे, गजानन चंदेवाड, ईश्वर चापकानडे, उमाकांत नागरगोजे, प्रवीण हामने, मारुती भोसकर, नरसिंग गायकवाड, कृष्णा गोरे व अनेक स्वयंसेवकानी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *