परभणी आकाशवाणी केंद्रावरुन अहमदपूर स्वीप पथकांने केली मतदार जनजागृती
तहसील कार्यालय अहमदपूर चा नाविन्यपूर्ण मतदार जनजागृती कार्यक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विवध स्तरावर जनजागृती होत आहे,विधानसभा निवडणूकीसाठी लातूर-परभणी जिल्हात सर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अहमदपूर स्वीप कला पथकाने नव मतदार,सुजाण मतदार व दिव्यांग मतदार,वयोवृध्द मतदार बंधू-भगिणीसाठी प्रबोधनपर लोकगीतांची रचना करुन लोकगीताच्या माध्यमातून राज्पातळीवर मतदार जनजागृती केली.
सदरील कार्यक्रमाचे आँल इंडिया रेडिओचे परभणी आकाशवाणी केंद्रावरुन दि १९ मंगळवार रोजी सकाळी ११:१० वा.या वेळेत प्रसारण होणार आहे. स्वीप कलापथकाने नाविन्यपूर्ण उपक्रमातून सकाळी ७ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत वेगवेगळ्या गावात जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन जनजागृती केली आहे. परभणी आकाशवाणी केंद्राचे प्रसारण तथा कार्यक्रम अधिकारी मोहित कोहाड, टायपिस्ट शिवकुमार स्वामी,ग्रंथपाल वंदना सरपाते,भास्कर थोरात, निवेदिका,वैशाली जोशी,अपर्णा पारवेकर,शीतल निमजे,वैशाली पांडे,सुषमा कुलकर्णी,सुमेधा कुलकर्णी,आदिनी २० नोव्हेंबर रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहान केले.
सदरील कार्यक्रमासाठी स्वीप पथक प्रमुख तथा निवेदक महादेव खळुरे,गायक शिवकुमार गुळवे,बसवेश्वर थोटे,मोहन तेलंगे,नागनाथ स्वामी सौ.अर्चना माने,आदिंनी विशेष परिश्रम घेतले. वरील उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी तथानिवडणूक निर्णय अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर,पोलिस अधिक्षक सोमय मुंढे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर,उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार उज्वला पांगरकर,नरसिंग जाधव,डायटचे प्राचार्य डाँ भगिरथी गिरी,
शिक्षणाधिकारी नागेश मापारी,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,दिलीप हैबतपूरे आदिनी आकाशवाणीवरुन मतदान जनजागृती केल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले.