विकास कामाचा डोंगर उभारणाऱ्या विकास पुरुष संजय भाऊ बनसोडे यांना महत्त्वाचे मंत्रिपद द्या – अॅड. वर्षाताई पंकज कांबळे

0
विकास कामाचा डोंगर उभारणाऱ्या विकास पुरुष संजय भाऊ बनसोडे यांना महत्त्वाचे मंत्रिपद द्या - अॅड. वर्षाताई पंकज कांबळे

विकास कामाचा डोंगर उभारणाऱ्या विकास पुरुष संजय भाऊ बनसोडे यांना महत्त्वाचे मंत्रिपद द्या - अॅड. वर्षाताई पंकज कांबळे

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघात केल्या कित्येक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणाऱ्या विकास पुरुषाला परिसराच्या विकासासाठी महत्त्वाचे मंत्रिपद द्यावे. अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या, समाजसेविका तथा विधीज्ञ वर्षाताई पंकज कांबळे यांनी केली आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, उदगीर विधानसभा मतदारसंघात तब्बल 6500 कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आणखीही काही विषय एरणीवर आहेत, शाश्वत विकासासाठी काही प्रकल्प उभा करणे गरजेचे आहे, आणि या कामाला गती देण्यासाठी विकास पुरुष असलेल्या संजय भाऊ बनसोडे यांना त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करून महत्त्वाचे मंत्रिपद द्यावे. अशा पद्धतीची भावना उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वच नागरिकांची आहे. त्यामुळेच उदगीरच्या जनतेने त्यांना जवळपास एक लाखाचे मताधिक्य दिलेले आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून आज तागायत इतके मोठे मताधिक्य कोणत्याही आमदाराला मिळवता आले नव्हते. असा ऐतिहासिक विजय या माणसाने मिळवला आहे. त्या व्यक्तीला मिळालेल्या मताधिक्याचा गौरव करत साजेसे मंत्रीपद देऊन, केलेल्या कार्याचा गौरव करावा. अशी भावना विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची असल्याचेही त्या म्हणाल्या.
उदगीर शहराचे कित्येक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघात गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी अशा पद्धतीचे धोरण राबवून ग्रामीण जनतेची सेवा करत असतानाच जलजीवन च्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये शुद्ध जल कशा पद्धतीने पोहोचवता येईल. यासाठी ही शेकडो कोटींची वॉटर ग्रीड्स योजना त्यांनी मंजूर करून आणली आणि आज ती योजना पूर्णत्वाकडे जात आहे. उदगीर शहरासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लिंबोटी धरणाच्या पाण्याचा प्रश्नही त्यांनी सोडवला आहे. आगामी 50 वर्षाहून जास्त काळापर्यंत उदगीर शहराला पाणीटंचाई कधीच जाणवणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी नियोजन केलेले आहे. या सर्व गोष्टी जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे.
अजित दादा पवार यांनी आज पर्यंत त्यांच्यावर प्रेम केलेलेच आहे. असेच प्रेम कायम ठेवत त्यांना ग्राम विकास सारख्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री केल्यास या परिसराच्या विकासाला प्रचंड गती येईल, आणि कधीकाळी डोंगराळ म्हणून संबोधला जाणारा उदगीर ,जळकोट तालुका हा सुजलाम सुफलाम होईल. यातील मात्र शंका नाही. हरित क्रांतीची बीजारोपण करण्यासाठी त्यांनी तेरू प्रकल्पावर बॅरेजेस उभारून या परिसरातील शेकडो हेक्टर्स जमीन कायम ओलिताखाली आणण्याचा प्रमाणित प्रयत्न केला आहे, आणि आजच्या घडीला नेत्यांनी अशाच लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवून दिलेले आहे. अशा विकासपुरुषाला मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद देऊन उदगीरच्या जनतेने दाखवलेला विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी सार्थ करावा. अशी अपेक्षाही विधिज्ञ वर्षाताई पंकज कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *