मासप केंद्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी उदगीरचे रामचंद्र तिरुके

0
मासप केंद्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी उदगीरचे रामचंद्र तिरुके

मासप केंद्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी उदगीरचे रामचंद्र तिरुके

उदगीरत विविध संस्था व संघटनाच्या वतीने सत्कार.

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सताळा येथील रहिवाशी व लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांची मराठवाडा साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल विविध संस्था व संघटनाच्या वतीने तिरुके यांचा सत्कार करण्यात आला.
दोन आठवड्यापूर्वी झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदे च्या निवडणूकीत प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने भरघोष मतांनी विजय मिळवत सर्व उमेदवार निवडून आल्याने छ. संभाजीनगर येथे पहिली बैठक पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली यात उदगीरचे रामचंद्र तिरुके यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल उदगीरात मसाप, जिवाळा ग्रुप, अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था, जेष्ठ नागरिक संघ अदिंनी सत्कार केला. यावेळी
रामचंद्र तिरुके यांनी मागच्या कार्यकारिणीतही सदस्य म्हणून काम केले आहे. उदगीर शाखेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. ४० वे मराठवाडा साहित्य संमेलन व ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीरला घेत देशाच्या नकाशावर मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. भविष्य काळातही अनेक साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून उदगीर, जळकोट, देवणी परिसरातील जनतेची साहित्यिक व सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्नशील
राहणार असल्याचे रामचंद्र तिरुके यांनी सांगितले. उदगीरला प्रथमच मसापचे उपाध्यक्षपद रामचंद्र तिरुके यांच्या रुपाने मिळाल्याने साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून ना. संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे, बसवराज बागबंदे, प्रा. पंडित सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, राज्य सांस्कृतिक धोरण समिती सदस्या अनिता यलमटे, धनंजय गुडसुरकर, प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, रामदास केदार, रसूल पठाण, लक्ष्मण बेंबडे आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *