उदगीरला मंत्रिपद मिळावे, म्हणजे विकासाला गती येईल – स्वप्निल जाधव

0
उदगीरला मंत्रिपद मिळावे, म्हणजे विकासाला गती येईल - स्वप्निल जाधव

उदगीरला मंत्रिपद मिळावे, म्हणजे विकासाला गती येईल - स्वप्निल जाधव

उदगीर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुका संपल्या तेव्हाच राजकीय हेवेदावे आणि मतभेदही संपले. आम्ही उदगीरच्या विकासाचा आराखडा घेऊनच विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलो होतो. मात्र जनता जनार्दनाने दिलेला निर्णय आम्ही सिरसावंद मान्य केला आहे. आजही आमच्या डोक्यात उदगीरच्या विकासाचेच विचार आहेत. आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा, उदगीर जिल्हा व्हावा, उदगीरला उद्योग धंदे उभारण्यासाठी मोठी एमआयडीसी व्हावी. अशीच आमची सकारात्मक भूमिका आहे. या भूमिकेतूनच आम्ही उदगीरला जर मंत्री पद मिळाले तर त्याचे निश्चित स्वागत करू. असे विचार युवा नेते तथा उदगीर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वप्निल अण्णा जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
विधानसभेचे राजकारण संपलेले आहे. आता प्रत्यक्ष समाजकारणासाठी आपण सदैव जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहणार आहोत. उदगीर विधानसभा मतदार संघातील जनतेने प्रेम दिले आहे. त्याची जाणीव ठेवून जनतेसाठी जे काही चांगले करता येईल, ते ते करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. असे ही स्वप्निल अण्णा जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
उदगीर तालुका आणि जळकोट तालुका कशा पद्धतीने विकासाकडे घेऊन जाता येईल. या दृष्टीने सकारात्मक विचारधारा ठेवून काम करणार आहे. आणि या कामाच्या दरम्यान आपले राजकीय विचाराचे जोडे बाजूला ठेवून फक्त सृजनात्मक कार्याला गती देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. असेही स्वप्निल जाधव यांनी याप्रसंगी स्पष्ट केले आहे. लवकरच आपण मतदार संघात आभार दौरा काढणार आहोत. जनता जनार्दनांनी प्रेम दिले, त्यामुळे आपण त्यांचे आभार व्यक्त करणे हे नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे धन्यवाद दौरा लवकरच काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *