महाविकास आघाडीचे विधानसभेतील गलथान नियोजन कार्यकर्त्याच्या मुळावर – वसंत शिरसे

0
महाविकास आघाडीचे विधानसभेतील गलथान नियोजन कार्यकर्त्याच्या मुळावर - वसंत शिरसे

महाविकास आघाडीचे विधानसभेतील गलथान नियोजन कार्यकर्त्याच्या मुळावर - वसंत शिरसे

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीला अत्यंत पोषक असे वातावरण होते. त्यामुळे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मात्र दुर्दैवाने अत्यंत ढिसाळ आणि गलथान नियोजनामुळे कार्यकर्ते एकसंघ राहिले नाहीत. इतकेच नाही तर महाविकास आघाडीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षातील महिला आघाडी पूर्णपणे महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे तसेच माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता प्रचाराची धुरा स्वतःच सांभाळल्यामुळे, महाविकास आघाडीला सपाटून मार खावा लागला.
ही गोष्ट महा विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना अत्यंत घातक ठरली आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची माती होऊ नये, असा विचार करून जवळपास 40 गावातून शेकडो कार्यकर्त्यांनी या गलथान नियोजनाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला राम राम ठोकायचा निर्णय घेतला असून तसे पत्र पक्षश्रेष्ठींला जिल्हाध्यक्ष मार्फत पाठवले असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष तथा माजी आमदार सुधाकर भालेराव यांचे निकटवर्ती नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत सिरसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे.
गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षात आम्ही कार्य केले. मात्र मध्यंतरीच्या काळात भारतीय जनता पक्षामध्ये आयाराम गयारामांची संख्या लक्षणीय वाढली, आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची माती होऊ लागली. त्यामुळे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यासोबत आम्ही पक्ष सोडला होता. मात्र पक्ष सोडल्यानंतर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जी वागणूक मिळाली, ती अत्यंत चुकीची ठरली, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे.

         कार्यकर्त्यांची फळी असताना देखील त्यांना डावलून विधानसभा निवडणुकीचे नियोजन महाविकास आघाडीने लावले, आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसून येत नव्हता. कार्यकर्त्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्यामुळे वातावरण पोषक असताना देखील कार्यकर्त्यांना मतदानातून जनतेचा कौल वळवता आला नाही. अशी स्पष्ट कबुलीही या पत्रकार परिषदेमध्ये वसंत शिरसे यांनी दिली. 

उदगीर शहरातील मातृभूमी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघातील 40 हून अधिक गावातील गाव पुढारी जे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले होते, त्यांनी पश्चाताप व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे वसंत शिरसे यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासोबत विठ्ठल डोईफोडे, मनोज गवारे, शिवलिंग आंबेगावे, विकास पवार, राहुल कारामुंगे, दीपक पाटील, नामदेव बोने, गणेश बिरादार, साहेबराव पाटील, करण जाधव, वामन पाटील, नितीन राठोड, चंद्रकांत मिरकले, संजय शेळके, मधुकर बिरादार, राजेश्वर पाटील, आयुब बागवान, शिवाजी बिरादार, मदन जाधव, संतोष भालेराव, उत्तम वाडीकर, व्यंकट मुरतळे, बाळासाहेब कानवटे, धनाजी मुळे, संजय जाधव, गजानन गुरूडे, नरेश नादरगे, नितीन डिगोळे, नामदेव वडजे, अमोल राठोड, प्रल्हाद देवनाळे, बाबुराव म्हेत्रे, चंद्रकांत बिरादार, जगन्नाथ मुसणे, आनंद बोंद्रे, देवा डोंगरे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *