उदगीरच्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाकडून नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्यातील अग्रगण्य असलेल्या उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या व शैक्षणिक क्षेत्रात आपला पॅटर्न निर्माण करणा-या महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या वतीने अहमदपूर – चाकूर विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, महाराष्ट्र एकिकरण समितीचे बीदर जिल्हा सचिव,युवानेते पृथ्वीभैय्या अशोकराव पाटील एकंबेकर, बाबा पाटील तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी अहमदपूर-चाकूर चे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील हे तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ लिपिक डी. पी. सूर्यवंशी तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. संतोष पाटील आदिंची उपस्थिती होती.