काँग्रेस च्या वतीने इंधन दरवाढ व महागाई विरोधात लातूरात सायकल रॅली

काँग्रेस च्या वतीने इंधन दरवाढ व महागाई विरोधात लातूरात सायकल रॅली

बैलगाडी मध्ये वाहन ठेवून लातूरात वाहनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली

लातूर (प्रतिनिधी) : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल,डिझेल,एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे.या जीवघेण्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यानुसार लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा इंधन दरवाढ व महागाई विरोधात सायकल रॅली चे आयोजन शनिवारी करण्यात आले. दरम्यान या सायकली रॅली आंदोलनात केंद्र सरकारच्या निषेध करीत बैलगाडीत वाहने ठेवून त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. सायकली रॅली सुरवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले इंधन दरवाढ व महागाई विरोधातील सायकल रॅलीची सुरुवात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथून झाली. त्यानंतर आई जगदंबा माता मंदिर गंजगोलाई, येथील मंदिरात देवीला साकडे घालून..हे केंद्र सरकार लवकरात लवकर पायउतार व्हावे यासाठी महाआरती करून साकडे घालण्यात आले त्यानंतर महात्मा गांधी चौक लातूर महात्मा गांधी यांना अभिवादन करून केंद्र सरकारच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. पुढे महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात आली.याप्रसंगी महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. या रैलीचा समारोप भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा

शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल, महागाई वाढवल्याचा निषेध करीत. बैलगाडीतून दुचाकी वाहनांची प्रेतयात्रा काढली गेली केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन त्याकडे लातूरकर लक्ष वेधून घेत होते या इंधन दरवाढ व महागाई विरोधातील सायकल रॅलीस” जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, सचिन दाताल, प्रवीण पाटील, सुरेश चव्हाण, अँड प्रदीप गंगणे, प्रवीण कांबळे,सिकंदर पटेल, अँड देवीदास बोरूले पाटील, मैनोदिन शेख, प्रा. देशमुख,माजी उपमहापौर कांबळे, महेश काळे, आनंद वैरागे, कव्हेकर, काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल, NSUI, सोशल मिडिया, इंटक विलासराव देशमुख युवा मंच आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

About The Author