राष्ट्रीय स्पर्धेत माही ने मिळवले दोन कास्यपदक
अहमदपूर ( गोविंद काळे )लातूर जिल्हा तलवारबाजी संघटना लातूर ची खेळाडू कुमारी माही किशोर आरदवाड हिने पटना, बिहार येथे दिनांक 02 ते 05 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या 32 वी कनिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत वैयक्तिक स्पर्धेत एक कास्यपदक तर सांघिक स्पर्धेत एक कास्यपदक प्राप्त केले. संघिक स्पर्धेत माही आरदवाड, जान्हवी जाधव, दिव्यांका कदम हे खेळाडू सहभागी झाले होते यात चार पैकी तीन अहमदपूर चे सहभागी होते. सर्वांना प्रशिक्षक मोसिन शेख व प्रशिक्षक आकाश बनसोडे या दोघांचा मार्गदर्शन लाभलं.
सर्व खेळाडूंचे अभिनंदन प्रा. गणपतराव माने(जीवन गौरव पुस्कार विजेते), डॉ. अभिजीत मोरे (अध्यक्ष तलवारबाजी संघटना लातूर),शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ताभाऊ गलाले, मुख्याध्यापक प्रशांत माने व संतोष कदम, ज्ञानोबा भोसले यांनी केले.