दयानंद शिक्षण संस्थेने माणूस घडवण्याचे मोठे कार्य केले
अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियममुळे लातूरच्या क्रीडा क्षेत्रातील वैभवात भर पडेल
भूतपूर्व केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या शैक्षणीक उपक्रमात दयानंद शिक्षण संस्थेने विविध महाविद्यालयात वेगवेगळे शैक्षणीक महाविद्यालय उपक्रम कार्यान्वित करून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चांगले शिक्षण देण्याचे मोठे काम केले असून त्यामूळे दयानंद शिक्षण संस्थेने माणूस घडवण्याचे मोठे कार्य केले आहे असे प्रतिपादन भूतपूर्व केंद्रीय गृहमंत्री तथा पंजाब चे माजी गव्हर्नर शिवराजजी पाटील चाकूरकर यांनी केले ते रविवारी ११ जुलै रोजी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने दयानंद महाविद्यालयातील होत असलेल्या अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमची पाहणी करण्यासाठी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते
यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, अँड श्रीकांत उटगे, कोषाध्यक्ष संजय बोरा, क्रीडा समितीचे चेअरमन अँड आशिष बाजपाई, डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, अँड रुद्राली पाटील चाकूरकर, प्रा. बी व्ही मोतीपवळे उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्टेडियम राहील
पुढे बोलताना शिवराजजी पाटील चाकूरकर म्हणाले की लातूरला पहिल्यांदा उच्च शिक्षनाची दारे दयानंद कॉलेज ने सुरू केले त्या काळात मारवाडी शिक्षण संस्था, गुजराती इंग्लिश स्कूल अशा संस्था कार्यरत होत्या आजही चांगल्या प्रकारे त्या संस्था मुलांना घडवण्याचे कार्य करीत आहेत असे सांगून दयानंद शिक्षण संस्था यांच्याशी माझे अतूट नाते राहिलेले आहे इथे मी प्राध्यापक म्हणून काम केले इथे खूप काही शिकता आले ती शिदोरी घेऊन मी कार्य करीत राहिलो अशा जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा देऊन दयानंद शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले संस्थेच्या वतीने तयार होत असलेले क्रिकेट स्टेडियम आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले ग्राउंड असून त्यामुळे क्रीडा क्षेत्रात व लातूरच्या वैभवात भर पडेल असा विश्वास व्यक्त करून दयानंद शिक्षण संस्थेने वेगवेगळे उपक्रम राबवून समाजातील लोकांना शैक्षणीक सुविधा उपलब्ध करून देवुन माणूस घडवण्याचे मोठे योगदान दिले आहे असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य अँड आशीष बाजपाई, अजिंक्य सोनवणे, विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, दीनानाथ भुतडा, हरिकिषण मालू, बालकिशन बांगड,शांतीलाल कुचेरिया, अँड माधव इंगळे सतीशचंद्र चापसी, उमाकांत केराळे,नरेश पंड्या,कुणाल कोरे, संस्थेच्या अंतर्गत वीविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक क्रीडा समितीचे चेअरमन अँड आशिष बाजपाई यांनी तर क्रिकेट स्टेडियमची माहिती संस्थेचे संचालक तथा स्टेडियम चे प्रमुख अजिंक्य सोनवणे यांनी दिली सूत्रसंचालन डॉ शिवाजी गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी मानले.