डोंगरशेळकी येथे सुवर्ण बिंदू प्राशन शिबीर संपन्न

डोंगरशेळकी येथे सुवर्ण बिंदू प्राशन शिबीर संपन्न

डोंगरशेळकी (प्रतिनिधी) : येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल,आरोग्यवर्धिनी उपकेंद्र डोंगरशेळकी आणि शतायु आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्या नक्षत्रानिमित्त 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांची रोग प्रतिकार शक्ती,बुद्धी तल्लख राहण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रोक्त विधिनुसार बनविलेले सुवर्णबिंदू प्राशन डोस शिबिर घेण्यात आले यामध्ये शिबिराचे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले तर अध्यक्षस्थानी सरपंच सौ नागरबाई व्यंकटराव कांबळे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.श्याम डावळे, उपसरपंच गणपत पवार, डॉक्टर सेलचे अध्यक्षा डॉ. भाग्यश्री घाळे, आरोग्य समुपदेशक शिफा खुरेशी, नरसन मरेवाड, समाधान कांबळे राहुल गजभारे, राजू पुंड, राहुल पुंड, सुशांत आपटे, आकाश मरलापल्ले, विष्णू बरुरे होते या शिबिरात गावातील आणि तांड्यावरील एकूण 357 बालकांना डोस पाजविण्यात आले शिबिराच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका दैवशाला बिरादार, अनुसया राठोड,सुशीला केंद्रे आशा कार्यकर्त्या मीरा सुवर्णकार, म्हादाबाई कांबळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author