जिच्या हाती पाळण्याची दोरी…तीच माऊली जग उद्घारी…आजीने केले नातवाला गायक

जिच्या हाती पाळण्याची दोरी...तीच माऊली जग उद्घारी...आजीने केले नातवाला गायक

औसा (प्रतिनिधी) : जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच माऊली जग उद्घारी…असं म्हणणं वावग ठरणार नाही पण राजनचा जन्म
एका गोंधळी घराण्यात गरीब कुटुंबात घरी झाला. पण देवाचं काय पाप केलं असेल की देवाने जन्म होताच जीची नाळ राजनसोबत जुळली होती
ती त्याला जन्म देऊन कायमची त्याच्या आयुष्यामधून सोडून गेली पण राजनची नाळ एका अश्या व्यक्ती बरोबर जुळाली ती म्हणजे राजनची आजी. घरची परिस्थिती हलाखीची. आई वारल्यामुळे वडिलांना दारु पिण्याचे व्यसन लागले, त्यांनी बेलकुंड येथील घरदार सर्व काही विकून ते मुरुड या ठिकाणी स्थायिक झाले. घरात लहान लहान तीन भावंडे आणि आईचा सहारा नाही , पण आई बाप सर्व काही आज्जीच झाली. आज्जी म्हणल की आपण कमजोर म्हातारी बाई समजतो पण जे आज्जीने राजनसाठी केल ते काम कोणीही करू शकत नाही. किरायाच्या घरात राहून आज्जीने अक्षरशः भिक मागून नातवंडाचे पोटाची खळगी भरली दोन्ही नातीचे लग्न करून दिले. राजन गरीब होता पण संस्कार हे खूप अनुभवाचे होते मनात जिद्द होती की, शाळा शिकुन आपल्या जीवनाला भरारी द्यावी पण घरची जबाबदारी सर्व त्याच्या वर होती त्यामुळे थोडेदिवस शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. कितीतरी संकट राजन वरती आले परंतु आज्जीने त्या सर्व संकटावर मात करून राजनला लहानाचं मोठं केलं राजनच्या आयुष्यात त्याने कधी देव पाहिला नाही पण त्याला आज्जीच्या रूपात देवच भेटला राजन देवीचे गोंधळ करून थोडे फार पैसे कमाऊ लागला पण राजन हा शिक्षणापासून वंचित होत चालला होता, पण त्याच्या “आजीने सांगितलं की भले माझं जीवन पणाला लागुदे पण तू शिक्षण घे” आणि आजीने अथक परिश्रम घेउन राजनला शिक्षण शिकवले. आजीने राजनच्या स्वप्नाला भरपूर पाठिंबा दिला आणि , तो आज दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे एम. ए ची डिग्री घेत आहे. आणि आत्तापर्यंत तीन चित्रपट पार्श्वगायक म्हणून काम केले व प्रसिद्धी मिळवली. राजनच्या गाण्याला सर्व महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे समाजातील गोंधळी भूषण पुरस्कार त्याला मिळाला पण खऱ्या
अर्थाने हा गौरव माझ्या आज्जीचा आहे असे राजन म्हणतो.आयुष्यात असा एक तरी गुरू पाहिजे जो आपल्या जीवनाला निस्वार्थपणे दिशा देईल आणि ते काम राजनासाठी आज्जीने केल. राजनला कॉलेजच्या फेस्टीव्हल साठी किंव्हा प्रोग्राम साठी महिना महिना बाहेर गावी जावं लागत असे आणि त्यामुळे आज्जीला घरी एकटीला एकटेपण भासत असे पण त्याहून अधिक आजीला याच नवल वाटे की आपला राजन हा दूर असला तरी नेशनल फेस्टीव्हल पर्यंत जाऊन पोहचला आहे . राजनच्या आनंदामधे आजीचा आनंद होता.
कारण आजीने आपल्या जीवनाचं सार्थक आपला नातू राजन यामधे पाहिल आणि ते राजनने सार्थ ही करून दाखवलं आणि राजन च एवढंच सांगणं आहे की आज्जी नसती तर माझ्या जीवनाला गंज लागला असता. प्रत्येकाच्या आयुष्यात राजन सारखी आजी नक्कीच मिळावी आणि म्हणून राजन अस म्हणतो.
आपण कोणत्याही नारी शक्तीला कमी लेखू नये आयुष्यात एखादी स्त्री पाहिजेच मग ती आई बहीण आज्जी मैत्रीण बायको पण समजून घेणारी आणि साथ देणारी एक जरी स्त्री असेल तर जीवनाचं कायापालाट व्हायला वेळ नाही लागत…

आज जे मी आहे ते फक्त आणि फक्त आज्जी मुळेच आहे माझ्या कातड्याचा जोडा करून जरी आज्जीच्या पायात घातला तरी तिचे उपकार फिटणार नाही…
मुलगी जन्मली तर नशीब फुटक आहे असं म्हणनाऱ्यांनो एकदा मनाला प्रश्न विचारा
देवाला पण नारीच्या उदरातून जन्म घ्यावा लागला..
मग विचार करा देव श्रेष्ठ की स्त्री..

About The Author