मुलांच्या सुप्त गुणांना अधिक वाव देणे आवश्यक आहे – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोना या जागतिक महामारीने मनुष्य जातीला एक वेगळाच अनुभव देऊन गेला.पण प्रत्येक संकटातून नवीन संधी निर्माण होते आणि जो त्या संधीचे सोने करतो तोच खरा माणूस होय आणि तसे व्यक्तीमत्व तयार करायचे असेल तर प्रत्येक शाळेत महाविद्यालयात विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मुलांच्या सुप्त गुणांना अधिक वाव देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश हाके यांनी केले.
ते सांगवी येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुतन वर्षानिमित्त आयोजित केलेल्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध ग्रामीण कवी बालाजी मुंडे,माजी जि प सदस्या तथा संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे यांची उपस्थिती होती.यावेळी गणेश हाके पुढे म्हणाले की कोविडच्या प्रादुर्भावामध्ये लाॅकडाऊन असताना सुद्धा प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतील प्रत्येक शिक्षक आसपासच्या प्रत्येक गावात जाऊन कशाचीच पर्वा न करता मुलांना ज्ञानार्जनाचे पवित्र कार्य करत गेले हे निश्चितच कौतुकास्पद आहे. याप्रसंगी कवी बालाजी मुंडे यांनी अस्सल ग्रामीण भाषेत वेगवेगळ्या कवीतांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजचा विद्यार्थी स्वंयअध्ययनावर भर न देता तयार गोष्टींचा, रेडीमेड साहित्याचा वापर करतोय त्यामुळे तो अधीकचा विचारच करत नाही पण या संस्थेच्या अंतर्गत प्रत्येक शाळेतील विद्यार्थी या गोष्टीला अपवाद असून येथील विद्यार्थी प्रत्येक श्रेत्रात नेत्रदीपक प्रगती करून समाजासाठी हातभार लावत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो.
कार्यक्रमाची सुरूवात संस्थेचे तत्कालीन सचिव कै अशोकराव हाके पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी श्रीमंगले ऋतुजा, राठोड प्रियंका, चव्हाण प्रतिक्षा, राठोड आश्विनी, राठोड सुवर्णा या मुलीच्या चमुने स्वागतगीताने स्वागत केले तर श्रीमंगले ऋतुजा या मुलीने सुंदर गीत गायिले तर अकरावीच्या सुरनर प्रिती या विद्यार्थीनीने सुंदर नृत्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या तरडे मॅडम यांनी केले सूत्रसंचालन दैवशाला शिंदे यांनी केले आणि आभार संतोष मुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश चेपूरे, अच्यूत सुरनर, संभाजी दुर्गे, चिंतन गिरी, मिनल गोगडे (सारोळे), कौशल्या देवकते, अमोल सारोळे, गजानन फुलारी, गणेश जाधव, शेख हिदायत, विवेकानंद सुरनर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अकरावी व बारावी कला व विज्ञाना शाखेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.